ETV Bharat / bharat

Lahore Bomb Blast : पाकिस्तानातील लाहोरमध्ये बॉम्बस्फोट; तीन जणांचा मृत्यू, 20 जखमी

author img

By

Published : Jan 20, 2022, 6:12 PM IST

Updated : Jan 20, 2022, 7:21 PM IST

पाकिस्तानातील लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात (Lahore Bomb Blast) तीन जणांचा मृत्यू झाला आहे. लाहोरच्या अनारकली (Anarkali) परिसरात हा स्फोट झाला आहे. यामध्ये जवळपास 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Lahore Bomb Blast
लाहोरमध्ये बॉम्बस्फोट

लाहोर - पाकिस्तानातील लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात (Lahore Bomb Blast) तीन जणांचा मृत्यू झाला आहे. लाहोरच्या अनारकली (Anarkali) परिसरात हा स्फोट झाला आहे. यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) दाखल करण्यात आले आहे.

  • BDDS टीम घटनास्थळी दाखल -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वस्तूंची विक्री होणाऱ्या पान मंडीजवळ हा स्फोट झाला. आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. लाहोरच्या ऐतिहासिक 'वॉल सिटी' जवळील स्फोटाच्या ठिकाणी पोलीस उपमहानिरीक्षक (ऑपरेशन्स) डॉ. मोहम्मद आबिद यांनी पत्रकारांना सांगितले की, "आम्ही स्फोटाचे स्वरूप जाणून घेत आहोत." या स्फोटात 20 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • स्फोटासाठी 'टाइम डिव्हाईस' लावण्याची शक्यता -

पोलीस अधिकारी आबिद यांनी मोटरसायकलवर किंवा मार्केटमध्ये 'टाइम डिव्हाईस' लावण्याची शक्यता नाकारली नाही. ते म्हणाले, 'स्फोटामुळे निर्माण झालेले खड्डे हे टाइम डिव्हाईसचा वापर असल्याचे दर्शवत आहेत. तथापि, आम्ही आत्ता कशाचीही पुष्टी करू शकत नाही. आबिद म्हणाले की, दहशतवाद विरोधी विभाग आणि बॉम्ब निकामी पथकाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि स्फोटाच्या प्रकाराची चौकशी करत आहेत.

Last Updated : Jan 20, 2022, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.