ETV Bharat / bharat

Climate of India : उष्णतेची लाट! अनेक भागांत तापमान ४७-४८ अंशावर जाण्याची शक्यता

देशभरात उन्हाची लाट आहे. सध्या देशात ७० टक्के भागांत उष्णतेची लाट सुरू असून यात सुमारे ८० टक्के लोकसंख्येच्या जिवाची लाही-लाही होत आहे. (Heat Wave In 70% of The India) काल बुधवार देशातील ३३ शहरांत तापमान ४४ अंशाच्या वर होते. दरम्यान, आगामी आठवडाभर राज्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उष्णतेची लाट
उष्णतेची लाट
author img

By

Published : Apr 28, 2022, 11:21 AM IST

मुंबई - देशभरात उन्हाची लाट आहे. सध्या देशात ७० टक्के भागांत उष्णतेची लाट सुरू असून यात सुमारे ८० टक्के लोकसंख्येच्या जिवाची लाही-लाही होत आहे. काल बुधवार देशातील ३३ शहरांत तापमान ४४ अंशाच्या वर होते. (Temperatures Expected To Reach) यात ७ शहरांत तापमान ४५ अंशाहून अधिक होते. दरम्यान, महाराष्ट्रात २५ हून अधिक शहरांत पारा ४१ अंशाच्या वर सरकला. ब्रह्मपुरी आणि वर्धा शहरांत तापमान ४५ अंशावर होते. दरम्यान, हीच परिस्थिती आज असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, विदर्भामध्ये सर्वात जास्त उन्हाची तीव्रता राहणार असल्याचे सांगितले. (Today Temperatures In India) आगामी आठवडाभर राज्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढता राहणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड या राज्यांत एप्रिलच्या अखेरच्या तीन दिवसांत तापमान वाढते राहील. १ मे रोजी उष्णतेच्या लाटेचा पीक असेल. या राज्यांत अनेक भागांत तापमान ४७-४८ अंशावर जाण्याची शक्यता आहे. २ मेपासून मात्र तापमानात घट होईल आसाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवेचा दाब वाढल्याने उष्णतेची लाट निरभ्र आकाश, वाऱ्याची अखंडिता व समुद्रसपाटीपासून एक ते दीड किलोमीटरवर हवेचा दाब वाढल्याने उष्णतेची लाट आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत लाट राहील. विदर्भात मात्र यानंतरही ही लाट कायम राहणार आहे. या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंश वाढण्याची शक्यता आहे.

  • राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान
  • ब्रह्मपुरी ४५.१
  • वर्धा ४५.०
  • अकोला ४४.८
  • नागपूर ४४.८
  • चंद्रपूर ४४.६
  • यवतमाळ ४४.२
  • जळगाव ४४.२
  • गोंदिया ४३.८
  • परभणी ४३.७
  • अहमदनगर ४३.७
  • वाशीम ४३.५
  • मालेगाव ४३.२
  • सोलापूर ४३.०
  • जेऊर ४३.०
  • गडचिरोली ४२.६
  • नांदेड ४२.२
  • औरंगाबाद ४२.१
  • उस्मानाबाद ४१.९
  • बुलडाणा ४१.८
  • पुणे ४१.३
  • नाशिक ४१.०
  • सातारा ४०.६
  • सांगली ४०.२
  • कोल्हापूर ३९.७

हेही वाचा - Chemicals Exports : भारत जगात सहाव्या क्रमांकावर! रासायनिक निर्यातीने गाठला उच्चांक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.