ईटीव्ही भारत - पतंजलीने ज्याप्रकारे देशात ब्रँड बनवला आहे. हा योगगुरू बाबा रामदेव यांचा चमत्कार आहे कि आक्रमक मार्केटींगचा परिणाम?
बाबा रामदेव - हे यश सामूहिक प्रयत्नातून मिळाले आहे. देशातील करोडो लोकांना आमच्यावर विश्वास आहे. आम्ही विदेशी कंपनीच्या एकाधिकार शाहीला मोडीत काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. आमच्या सोबत अनेक क्रिकेटर आणि सेलेब्रेटी आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही पतंजलीच रिच वाढवतो आहे.
ईटीव्ही भारत - तुम्ही रुची सोयाचा आयपीओ आणणार आहे, तो केंव्हा येईल?
बाबा रामदेव- आमच्याकडे गुंतवणूकदार लाईन लावून उभे आहेत. अनेक जण रुची सोयामध्ये पैसे गुंतवायला तयार आहे. लोकांमध्ये विश्वास वाढला आहे. हीच आमची आतापर्यंतची कमाई आहे. आम्ही याला खेळ मानत नाही. आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारावर डिलीव्हरी करणार आहोत.
ईटीव्ही भारत - आयपीओ केंव्हा येणार आहे आणि सेबीमध्ये काय स्थिती आहे?
बाबा रामदेव - आम्ही सेबीमध्ये डीआरएस फाईल केला आहे. लवकरच तेथून फाईल क्लियर होऊन येईल, अशी अपेक्षा आहे. आयपीओ पूर्ण पारदर्शकपणे येईल. रुची सोयामध्ये कोणाताही वाद नसेल. लवकरच प्रक्रिया पूर्ण करून आम्ही आयपीओ बाजारात आणणार आहे.
ईटीव्ही भारत - रुची सोयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. तुम्ही आयपीओची आणण्याचे म्हणाता आहात. आज बाजारात अॅनालिस्ट संशय व्यक्त करत आहे, कारण रुची सोयामध्ये अद्यापही प्रमोटर्सची होल्डिंग 98 टक्के आहे. सामान्य नागरिक टक्केवारीला घाबरतो. काय सांगाल?
बाबा रामदेव- आम्ही 100 टक्के शेयर आमच्याकडे ठेवू शकलो असतो. मात्र, ज्यांनी यामध्ये पैसे लावले होते. त्यांना उत्तम परतावा मिळायला हवा, यासाठी आम्ही असे नाही केले. ज्या लोकांनी येथे पैसे लावले. त्यांच्या एका टक्क्यालाही मुल्य मिळाले आहे. पूर्वी सात रुपयाचा शेयर होता. आता शेयरची किंमत वाढली आहे. यामध्ये गुंतवणूकदार आणि कंपनीचे हित आहे. यात स्वामी रामदेवचे कोणतेही हित नाही.
ईटीव्ही भारत - इंधनाच्या वाढत्या किंमतीची चर्चा होत आहे. मात्र, वाढत्या खाद्य तेलाच्या किंमतीची चर्चा होत नाही. त्यामुळे रुची सोया सारख्या एफएमसीजीची भूमिका महत्त्वाची होते. काय सांगाल?
बाबा रामदेव- आपण आत्मनिर्भार नाही, त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. एडिबल ऑयल क्षेत्रात आपण लवकरच आत्मनिर्भर होऊ. कोरोनाकाळात महागाईमुळे जनता परेशान आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या काळात एडिबल ऑयल क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होऊ, असे आश्वासन देतो.
ईटीव्ही भारत - तुम्ही आता म्हटले की सरकारने उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, तुमच्यामते सरकारने काय करायला हवे?
बाबा रामदेव- सरकारने महागाई कमी करण्यासाठी कठोर पावले उचलावी. यासाठी योग्य ती योजना बनवावी. आम्ही अपेक्षा करतो करतो की सरकार लवकरच याविषयी योग्य तो निर्णय घेतील.
ईटीव्ही भारत - तुम्ही एका मुलाखतील म्हटले होते कि 2025 पर्यंत पतंजली एफएमसीजीमध्ये देशातला नंबर वन ब्रँड होईल. हे हिंदुस्थान लिव्हरसाठी आव्हानात्मक नाही का? काय तुम्ही हिंदुस्थान लिव्हर सारख्या अन्य कंपन्या घेण्याच्या तयारीत आहात?
बाबा रामदेव- आम्ही 99 टक्के कंपन्यांना मागे सोडले आहे. फक्त एकच कंपनी आमच्या पुढे आहे. आम्ही कोणतेच बेकायदेशीर काम करणार नाही. आमचा कंज्यूमर बेस यूनिलिव्हरपेक्षा मोठा आहे. आम्ही कॉस्टेटिक आणि वेलनेसवर करतो आहे.
ईटीव्ही भारत - तुम्ही उत्पादन तर करत आहात. मात्र, बाकी कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनानुसार काम करत आहे. याचा सामना कसा कराल?
बाबा रामदेव- आमच्याकडे जगातले सर्वात मोठे रिसर्च फाउंडेशन आहे. यापुढेही रुची सोयापासून जो पैसा येईल. तो रिसर्चमध्ये खर्च होईल. त्यासोबतच तो शिक्षण आणि कृषी क्षेत्रातही खर्च होईल. आमच स्वप्न आहे कि पतंजली लोकल ते ग्लोबल बनेल.
ईटीव्ही भारत - हा प्रश्न अशासाठी होता की, तुम्ही म्हणाता पतंजलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन होत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळत नाही. यासाठी विशेषज्ञांची आवश्यकता आहे?
बाबा रामदेव- कोणत्या देशात संशोधन सुरु आहे, हे महत्त्वाचे नाही. त्या संशोधनाचे पॅरामीटर्स काय आहे. ते महत्वाचे आहे. जगात योग आणि आयुर्वेदवर जितके संशोधन होते त्यापैकी 10 टक्के पतंजली करते. त्याला आम्ही 25 टक्के करण्याचा प्रयत्न करत आहोत.
ईटीव्ही भारत - लोक म्हणतात पतंजलीचे यश बाबा रामदेव यांच्या ब्रँडींगमुळे आहे. तुम्ही स्वत:च्या ब्रँडींग पतंजलीला या ठिकाणी पोहोचवले आहे. भविष्यात तुम्हीच पतंजलीचा चेहरा असाल, की नवे ब्रँड अॅबेसिटर जोडण्याचा प्रयत्न असेल?
बाबा रामदेव- मी एकटा काहीही करत नाही. ये सर्व टीमचे प्रयत्न असतात. पुढे अनेक सेलेब्रिटांना आणणार आहे. नवे ब्रँड अॅबेसिटर पण असतील. लवकरच याबाबतचा खुलासा होईल. सद्या त्यांच्याशी करार करणे सुरु आहे. यामध्ये बॉलिवुूड आणि खेळाडूंचाही समावेश आहे.
ईटीव्ही भारत - तुम्ही म्हटले होते की पतंजलीचा आयपीओ येईल, पतंजलीचे सीम येईल. केंव्हा येणार आहे?
बाबा रामदेव- पतंजली लवकरच बाजारात येईल. याबाबत लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. याचे सर्व कामे झाली आहेत. योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही बाजारात उतरू.
ईटीव्ही भारत - देशात उत्पादन आणि निर्यात वाढवण्यासाठी सरकारचे निर्णय महत्त्वाचे असतात. मोदी सरकार आल्यानंतर कोणता मोठा बदल तुम्हाला जाणवतो.
बाबा रामदेव- मी नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि त्यांच्या सहकार्यांना जवळून काम करताना बघितले आहे. त्यांचा हेतू साफ आहे. त्यांच्यासाठी जात, धर्मापेक्षा देश मोठा आहे. मला अपेक्षा आहे कि शेती, मुलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, संशोधन आणि सुरक्षा बाबतीत देश पुढे जात आहे. कोरोनामुळे अनेक समस्या आहेत. मात्र, सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे.
ईटीव्ही भारत - वाढत्या लोकसंख्येला मोठ्या उत्पादनाची आवश्यकता आहे. त्यासाठी कच्चा मालाची आवश्यकता आहे. मात्र, माल उपलब्ध नसल्याने किंमती वाढत आहे. याचे परिणाम दिसत आहे. याकडे कसे बघता?
बाबा रामदेव- आम्ही आत्मनिर्भर झालो आहे. आम्हाला लागणारा 90 टक्के कच्चा माल भारतात तयार होतो. तसेच एडिबल ऑयल क्षेत्रात अनेक महत्त्वाची पावले उचलावे लागेल.
ईटीव्ही भारत - महागाई, जनसंख्या, पेट्रोल-डीझलच्या किंमती वाढत आहे, यावर पुन्हा विचार व्हायला हवा, असे तुम्हाला वाटते का?
बाबा रामदेव - देश चालवायला टॅक्स आवश्यक आहे. सरकार इंधनावर टॅक्स लावते. जेणेकरून त्यांना पैसा मिळेल. सरकारला याबाबतीत बॅलेन्स करावा लागेल.