ETV Bharat / bharat

Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची ईटीव्ही भारतसोबत एक्सक्लुझिव्ह बातचित, म्हणाल्या...

आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी डेहराडूनमध्ये ( Priyanka Gandhi in Uttarakhand ) दाखल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह पाहायला मिळाला. आज काँग्रेसचे 'उत्तराखंड स्वाभिमान प्रतिज्ञापत्र'ही त्यांच्या हस्ते जारी करण्यात आले. यावेळी ईटीव्ही भारतने प्रियांका गांधी यांच्याशी ( Priyanka Gandhi's Exclusive Interview with ETV India ) खास बातचीत केली.

प्रियांका गांधी
Priyanka Gandhi
author img

By

Published : Feb 2, 2022, 5:39 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी डेहराडून ( Priyanka Gandhi in Uttarakhand ) दौऱ्यावर आहेत. उत्तराखंड निवडणुकीची तयारी सुरू झाल्यापासून उत्तराखंड काँग्रेस प्रियंका गांधींच्या दौऱ्याची वाट पाहत होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रियंका गांधींचा दौरा नियोजित होता. परंतु वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तो दौरा पुढे ढकलावा लागला होता. आज प्रियंका गांधी डेहराडूनमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह पाहायला मिळाला. आज काँग्रेसचे 'उत्तराखंड स्वाभिमान प्रतिज्ञापत्र'ही त्यांच्या हस्ते जारी करण्यात आले. यावेळी ईटीव्ही भारतने प्रियांका गांधी यांच्याशी खास बातचीत ( Priyanka Gandhi's Exclusive Interview with ETV India ) केली.

प्रियांका गांधींची ईटीव्ही भारतसोबत एक्सक्लुझिव्ह बातचित...

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर प्रियंका यांनी राज्यातील जनतेला संबोधित करत मतदान करण्याचे आवाहन केले. तुमचे मत वाया जाऊ देऊ नका, असे त्या म्हणाल्या. राज्यातील जनतेचा उत्साह पाहून काय वाटते या प्रश्नावर प्रियंका म्हणाल्या, की राज्यातील लोकांमध्ये एवढा उत्साह पाहून मला खूप आनंद होत आहे. राज्यातील जनतेने विकासाच्या जोरावर मतदान करावे, कोणत्या पक्षाने आपल्यासाठी काय केले, याच्या आधारे त्यांनी मतदान करावे.

याशिवाय, प्रियांका गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातून गरीब, मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांना दिलासा न मिळाल्यामुळे सरकारवर हल्लाबोल केला. अर्थसंकल्पात फक्त बड्या उद्योगपतींसाठी भरीव पॅकेज होते. भाजपा सरकारचा हा मनसुबा असल्याचे ते म्हणाले. आपल्या काही उद्योगपती मित्रांचीच भरभराट व्हावी, ही त्यांची विचारधारा आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा - हिंदुस्तानी भाऊचा संताप; म्हणाला, याच देशात राहून पाकिस्तानचं कौतुक कराल तर....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.