नवी दिल्ली- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी ( Gujarat Assembly elections ) मोर्चेबांधणी केली आहे. गुजरातमध्ये एकापाठोपाठ एक राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. ईटीव्ही भारतने ऑल इंडिया मजलिस इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची ( Asaduddin Owaisi Gujarat visit ) खास मुलाखत घेतली.
एमआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी ( AIMIM Gujarat election preparation ) सुरू आहे. याच अनुषंगाने ते गुजरात एआयएमआयएम पक्षाच्या नेत्यांना ( leaders of Gujarat AIMIM party ) भेटण्यासाठी आलो आहे. रमजाननंतरही ( Ramadan ) मी येत्या काही महिन्यांत गुजरातला भेट देईन आणि येथील लोकांना भेटणार आहे.
गुजरात निवडणुकीत सर्वोतपरी प्रयत्न करून उमेदवार उभे करू- असदुद्दीन ओवेसी म्हणाले, की गुजरातमधील जनतेचे प्रेम लाभले आहे. आमचा पक्ष विधानसभेत यशस्वीपणे पोहोचला आहे. ते पुढे म्हणाले की, एमआयएम यूपीमध्ये जिंकली नाही. तर बिहारमध्ये जिंकली आहे. गुजरातमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत. तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांनी मोठ्या संख्येने पालिकेत जागा ( AIMIM win in Gujarat corporation election ) मिळविल्या आहेत. कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला नाही. 27 वर्षांपासून भाजप गुजरातमध्ये जिंकत नसून काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे विजयी झाला आहे, असे ते म्हणाले. यावेळी आपण सर्वतोपरी प्रयत्न करून उमेदवार उभे करू, असे ते म्हणाले.
हेही वाचा-Bird Sanctuary In Raipur : वसाहतीत उभारले पक्षी अभयारण्य;पहा ईटीव्हीचा खास रिपोर्ट
हेही वाचा-Woman Tied In Surat : धक्कादायक! तब्बल बावीस वर्षांपासून महिलेला ठेवले बांधून
हेही वाचाcow smuggling mafia arrest : ईशान्य भारतात गोवंशची तस्करी; आसाम पोलिसांकडून युपीमध्ये माफियाला अटक