ETV Bharat / bharat

Exam Fever 2022 : बिहारमधील एकाच गावात घडले 150 आयआयटीयन्स; यशस्वी विद्यार्थीच देतात मोफत शिक्षण

बिहारमधील गया येथील पटवाटोली 'आयआयटीयन्सचे गाव' म्हणून देशभरात आपला ठसा उमटवित आहे. यशस्वी विद्यार्थी स्वत: आता नवीन विद्यार्थी ( Exam Fever 2022 ) घडवित आहे. पटवाटोलीतून बाहेरून देश-विदेशात काम करणारे आयआयटीयन येथे वर्ग घेतात.

एकाच गावात घडले 150 आयआयटीयन्स;
एकाच गावात घडले 150 आयआयटीयन्स;
author img

By

Published : Apr 20, 2022, 7:04 PM IST

गया - बिहारमधील गया जिल्ह्यातील मानपूर पटवाटोली या गावातील प्रत्येक घरात आयआयटीयन ( IITians in Gaya ) होण्यासाठी तयारी सुरू आहे. करियरमध्ये यशस्वी झाल्यानंतर देश-विदेशात नोकरी करणाऱ्यांकडून पटवाटोली गावात हे प्रयत्न सुरू झाले आहेत. आयआयटीयनच्या यशासाठी आधीच प्रसिद्ध असलेल्या पटवाटोलीला बिहारच्या आयआयटीयन्सचे गाव करण्याची ( Village of IITians of Bihar ) तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये यश ( Exam Fever 2022 ) मिळवून देण्यासाठी संपूर्ण शिक्षण मोफत देण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सिनिअर्सकडून प्रेरणा व मार्गदर्शन दिले जात आहे.

यंत्रमागांच्या मोठ्या आवाजात विद्यार्थ्यांचा अभ्यास - बिहारच्या गया जिल्ह्यातील मानपूर येथील पटवाटोली गाव हे यंत्रमाग ( Patwatoli Powerloom Industry of Manpur ) उद्योगासाठी ओळखले जाते. आयआयटीयमध्ये विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. यंत्रमागांच्या कर्कश आवाजात, गया, पटवाटोली येथे 'वृक्षा' नावाचे मोफत वाचनालय उभारण्यात आले आहे. हा एक नवीन उपक्रम आहे. यामुळे शेकडो विद्यार्थीही यशस्वी झाले आहेत. गया येथील मानपूर पटवा टोली मोहल्ला येथे पटवा समाजाची शेकडो कुटुंबे राहतात. अरुंद गल्ल्या आणि हजारो पॉवरलूमचा कर्कश आवाज असूनही, हा परिसर हळूहळू आयआयटीयन्सचे गाव म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

यशस्वी विद्यार्थीच देतात मोफत शिक्षण

वृक्षा - बी द चेंज मोहीम - हे वाचनालय सरकारी वाचनालय नसून आयआयटीमध्ये यश मिळवून विदेशात नोकरी करणाऱ्या गावातील तरुणांच्या आर्थिक मदतीवर चालते. चंद्रकांत पाटेश्वरी म्हणाले, की 1996 मध्ये गावातील जितेंद्र नावाच्या तरुणाला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाल्यापासून गावामधील बदलाला सुरुवात झाली. येथील मुलांना त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये जेईईच्या तयारीची क्रेझ निर्माण झाली. जितेंद्र यांनी ट्री बी द चेंज संस्थेच्या नावाने हे वाचनालय येथे सुरू केले आहे. येथे सर्व विद्यार्थी विनामूल्य अभ्यास करू शकतात. येथे पुस्तकांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

गरीब विद्यार्थ्यांना होत आहे मदत - येथे कोणताही विद्यार्थी मोफत शिक्षण घेऊ शकतो. गावात आयआयटीची तयारी करणारे, आयआयटीमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोचिंगही देतात. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थी येथे येतात. येथे पॉवरलूम्सचा कर्कश आवाज असतानाही आयआयटीयन्स घडत आहेत. गरीब घटकांपासून ते सर्वसामान्य विद्यार्थी हे आयआयटीयन होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. त्यामुळे येथील मुले दरवर्षी आयआयटीमध्ये यश मिळवितात.

अशी झाली वृक्षसंस्थेची सुरुवात - संस्थेचे संस्थापक चंद्रकांत पाटेकर यांनी सांगितले, की माझ्या काही मित्रांना शिक्षण घ्यायचे होते. पण त्यांच्याकडे अभ्यासासाठी पैसे नव्हते. तेव्हापासून आपण काहीतरी केले पाहिजे असे वाटू लागले. पैशांमुळे एकही मूल मागे राहू नये, असा आमचा प्रयत्न आहे. येथील प्रत्येक घरात अभियंते आहेत. त्या सर्वांचे सहकार्य लाभते. जितेंद्र सिंग हे 1992 मध्ये पास झाल्यापासून मदत करतात.

आयआयटीयन्सचे गाव - लायब्ररीचे संचालक चंद्रकांत पाटेश्वरी म्हणाले, की की पटवाटोली पूर्वी बिहारचे मँचेस्टर म्हणून ओळखले जात असे. कारण येथे चादरी, टॉवेल आदींची निर्मिती लूमद्वारे केली जाते. पण आता ते आयआयटीयन्सचे गाव म्हणूनही ओळखले जाते. आता दरवर्षी या गावातील डझनहून अधिक विद्यार्थ्यांची कोणत्याही मोठ्या कोचिंगशिवाय जेईईमध्ये निवड होते. गेल्या वर्षी येथून 8 मुले आयआयटीच्या पूर्व परीक्षेत पास झाले. आतापर्यंत एकूण सुमारे 150 मुले यशस्वी झाली आहेत.

यंत्रमागाचा गोंगाटही चांगला वाटतो- पटवटटोलीतील यंत्रमागाच्या गोंगाटात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना गोंगाटाची कोणतीही अडचण नाही. हा गोंगाट त्यांच्यासाठी संगीताच्या सुरासारखा आहे. गोंगाटातही ते एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. लायब्ररीत शिकणारा मोहित हा विद्यार्थी सांगतो की, मोबाईल नसल्यामुळे अडचण येत होती. जर मी यशस्वी झालो तर भविष्यात मी इतर विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करेन.

हेही वाचा-Indian Army recruitment 2022; दहावी-बारावी पास उमेदवारांकरिता भारतीय सैन्यदलात 'या' पदाकरिता संधी

हेही वाचा-जहांगीरपुरीतील अतिक्रमण कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; उद्या होणार सुनावणी

हेही वाचा-Exam Fever 2022 : दोन वर्षानंतर अमरावती विद्यापीठाची परीक्षा; 50 टक्केच प्रश्न सोडविण्याची मुभा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.