श्रीनगर : भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ( JKLF ) आणि हुर्रियत या संघटनांवर बंदी घातलेली आहे. मात्र जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ( JKLF ) आणि हुर्रियत या संघटनांना पुन्हा सक्रिय करण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ( JKLF ) आणि हुर्रियतच्या 10 माजी दहशतवाद्यांच्या सुरक्षा दलांनी मुसक्या आवळल्या आहेत. या माजी दहशतवाद्यांवर यूएपीए ( UAPA ) कायद्याच्या कलम 10, 13 आणि भारतीय दंड विधान कायद्याच्या विविध कलमांनुसार कोठीबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाकिस्तानी हस्तकांच्या सूचनांवरुन आखली योजना : जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ( JKLF ) आणि हुर्रियत या संघटनांवर देशविरोधी कृत्य केल्यामुळे बंदी घालण्यात आली आहे. मात्र काही माजी दहशतवाद्यांनी या संघटनेला पुन्हा सक्रिय करण्यासाठी कट आखल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पाकिस्तानच्या काही हस्तकांच्या सागण्यावरुन या संघटनेला पुन्हा नवजीवन देण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलांच्या जवानांनी ही कारवाई केली आहे.
-
In this regards, FIR no 23/2023 under sections 10,13 of Unlawful Activities Prevention Act & section 121-A of IPC stands registered in Kothibagh PS. Ten(10) Accused have been formally arrested so far in this 'JKLF-Hurriyat revival conspiracy' Case. Some More arrests are likely. https://t.co/YdxZBKd0US
— Srinagar Police (@SrinagarPolice) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In this regards, FIR no 23/2023 under sections 10,13 of Unlawful Activities Prevention Act & section 121-A of IPC stands registered in Kothibagh PS. Ten(10) Accused have been formally arrested so far in this 'JKLF-Hurriyat revival conspiracy' Case. Some More arrests are likely. https://t.co/YdxZBKd0US
— Srinagar Police (@SrinagarPolice) July 10, 2023In this regards, FIR no 23/2023 under sections 10,13 of Unlawful Activities Prevention Act & section 121-A of IPC stands registered in Kothibagh PS. Ten(10) Accused have been formally arrested so far in this 'JKLF-Hurriyat revival conspiracy' Case. Some More arrests are likely. https://t.co/YdxZBKd0US
— Srinagar Police (@SrinagarPolice) July 10, 2023
केजीसी आणि जेकेएलएफची झाली बैठक : पाकिस्तानस्थित हस्तकांच्या सांगण्यावरून या संघटनांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली होती. यातील सदस्य परदेशातील हस्तकांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात उघड झाली आहे. त्यापैकी काही फारुख सिद्दीकीच्या नेतृत्वाखालील काश्मीर ग्लोबल कौन्सिल आणि JKLF चे राजा मुझफ्फर यासारख्या फुटीरतावादाचा प्रचार करणाऱ्या गटांचे सदस्य असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. केजीसी आणि जेकेएलएफ या संघटनांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी बैठक झाली. बैठकीचा खरा अजेंडा पुनरुज्जीवनाच्या रणनीतीवर चर्चा होता. ही बैठक म्हणजे या मरगळलेल्या संघटनांच्या पुनरुज्जीवनासाठी काम सुरू करण्याचा एक उघड प्रयत्न होता. 13 जून 2023 रोजी या गटाची प्राथमिक बैठक झाली होती, यामध्ये बहुतेक जण उपस्थित असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
फुटीरतावाद्यांच्या काही माजी नेत्यांच्या बैठकीत भेटी : श्रीनगरमधील हॉटेलमध्ये जेकेएलएफ आणि फुटीरतावाद्यांच्या काही माजी नेत्यांच्या भेटीबाबत सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या नुसार शोध गेतला असता, जेकेएलएफ आणि हुर्रियतच्या काही सदस्यांना पकडण्यात आले. त्यांना पडताळणीसाठी कोठीबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी चौकशी सुरू झाली असून प्रथमदर्शनी JKLF आणि हुर्रियतला पुनरुज्जीवित करण्यासाठी ते नियोजन करत असल्याचे पुढे आले आहे.
सुरक्षा दलांनी या दहा जणांच्या आवळल्या मुसक्या : देशविघातक कृत्यामध्ये सहभाग असल्याच्या कारणावरुन सुरक्षा दलाच्या जवानानी दहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यावर कोठीबाग पोलीस ठाण्यात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 आणि IPC च्या कलम 121-A अन्वये एफआयआर क्रमांक 23/2023 नोंद करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या माजी दहशतवाद्यांमध्ये मोहम्मद यासीन भट ( रा. निगेनबाग श्रीनगर ) , मोहम्मद रफिक पहलू ( रा. नातीपोरा ) , शम्स उदिन रहमानी अमीर अहमद ( रा. लालबाजार ) , जहांगीर अहमद ( रा सोपोर ), खुर्शीद अहमद भट ( रा रावलपोरा ) , शाबीर अहमद दार ( बदामवारी सोपोर ), साजाद हुसेन गुल ( पंथाचौक, श्रीनगर ) , फिरदौस अहमद शाह (रा श्रीनगर ), पॅरे हसन फिरदौस ( रा. लवायपोरा श्रीनगर ) , सोहेल अहमद मीर ( पीरबाग, बडगाम ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या माजी दहशतवाद्यांची नावे आहेत.
हेही वाचा -
- Encounter In Baramulla : बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
- Kulgam Encounter : भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू
- JK Kupwara Encounter : कुपवाडामध्ये पाच विदेशी दहशतवाद्यांना धाडले यमसदनी; लष्करी जवानांकडून शोधमोहीम सुरूच