ETV Bharat / bharat

Free Electricity In Panjab: पंजाबमधील प्रत्येक घरी आजपासून दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळणार -मान - पंजाबमध्ये 300 युनिट मोफत वीज मिळणार

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने प्रत्येक घरात 300 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. पंजाब सरकारने जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली आहे. ( Free Electricity In Panjab ) मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आजपासून पंजाबमधील प्रत्येक कुटुंबाला दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.

पंजाब सरकारकडून 300 युनिट वीज मोफत मिळणार

author img

By

Published : Jul 1, 2022, 5:23 PM IST

चंदीगड - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, त्यांचे सरकार राज्यातील जनतेला दिलेली हमी पूर्ण करत आहे, ज्या अंतर्गत शुक्रवारपासून प्रत्येक घराला 300 युनिट वीज मोफत दिली जाईल. ( Every Household In Punjab Will Get 300 Units Electricity ) आम आदमी पक्षाच्या सरकारने यापूर्वी 1 जुलैपासून प्रत्येक घरात 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती.

प्रत्येक घरात प्रत्येक महिन्याला 300 युनिट - मान यांनी ट्विट केले की, 'पूर्वीची सरकारे निवडणुकीच्या वेळी आश्वासने देत असत. आश्वासनांच्या पूर्ततेसाठी पाच वर्षे निघून जायची, पण आमच्या सरकारने पंजाबच्या इतिहासात नवा आदर्श घालून दिला आहे. आज आपण पंजाबींना दिलेले आणखी एक वचन पूर्ण करणार आहोत. आजपासून पंजाबमधील प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. (2022)च्या पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान (AAP)ने दिलेल्या आश्वासनांपैकी एक म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज पुरवणे.

सरकारचा पहिला अर्थसंकल्प - आप नेते आणि राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा म्हणाले की, लोकांना मोफत वीज पुरवणारे पंजाब हे दिल्लीनंतर दुसरे राज्य बनले आहे. चढ्ढा यांनी ट्विट केले की, 'आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण मोफत वीज मिळणारे पंजाब हे दिल्लीनंतर दुसरे राज्य बनले आहे. केजरीवाल यांनी पंजाबींना दिलेली पहिली हमी पूर्ण झाली आहे. यापूर्वी 27 जून रोजी अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी आप सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते, की 300 युनिट वीज मोफत दिल्याने सरकारी तिजोरीवर 1,800 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.

हेही वाचा - Punjab Lok Congress: कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा 'पंजाब लोक काँग्रेस' भाजपमध्ये विलीन होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.