- आज या घडामोडींवर असणार नजर
नाशिक - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावर असणार.
नवी दिल्ली - 127 वे घटनादुरूस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत सादर केल्यानंतर भाजपने आपल्या सर्व खासदारांना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
- कालच्या महत्वाच्या बातम्या -
नवी दिल्ली - 127 वे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत सादर केल्यानंतर भाजपने आपल्या सर्व खासदारांना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर 10 तारखेला लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..
नवी दिल्ली - भारताची राजधानी दिल्लीमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान सोमवारी पार पडला. भारताला पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकून देत इतिहास रचणारा नीरज चोप्रा याच्याशिवाय, कास्य पदक जिंकणारा भारतीय पुरुष संघ, कास्य पदक विजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन, कास्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, रौप्य पदक विजेता रवी कुमार दहिया यावेळी उपस्थित होते. या खेळाडूंनी आपला ऑलिम्पिकचा अनुभव सांगितला. वाचा सविस्तर..
जालना - राज्यांतील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत संबंधित विभाग स्वतंत्र निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. कोरोनाची परिस्थिती पाहून स्वतंत्र निर्णय घ्यावा, अशी सूचना तीन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने दिली होती, अशी माहिती टोपे यांनी दिली. पाहा व्हिडिओ..
पुणे - पुण्यात अग्निशमन दलाच्या जवानांकडून चित्तथरारक घटनेनंतर चौथ्या मजल्यावर खिडकीबाहेर लटकलेल्या 14 वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये काल सकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलीला खाली उतरवल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. वाचा सविस्तर..
जम्मू-काश्मीर - अनंतनाग येथील भाजपचे सरपंच रसूल डार आणि त्यांची पत्नी जवीरा यांची दहशतवाद्यांनी गोळ्या मारून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोघेही रेडवानी कुलगाम येथील रहिवासी असून, सध्या ते अनंतनाग येथे भाड्याच्या घरात राहत होते. वाचा सविस्तर..
मुंबई - 'मोदीसाहेबांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत. राज्यमंत्र्यांना किती अधिकार व कितीजण धोरण ठरवत आहेत, हे देशातील प्रत्येक राजकीय लोकांना माहीत आहे. त्यामुळे, ज्या मंत्र्यांना अधिकार नाहीत ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झाले आहेत. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला. वाचा सविस्तर..
नवी दिल्ली - पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हेरगिरीचे सॉप्टवेअर विकणाऱ्या एनएसओ ग्रुपसोबत कसलाही आर्थिक व्यवहार केला नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत दिले. त्यामुळे, आता यावर विरोधकांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. वाचा सविस्तर..
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता जमा केला. आभासी पद्धतीने देशभरातील 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 हजार 500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर..
पुणे - मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणारे भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा लढा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. ते पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये बोलत होते. दरम्यान, आता पुढचे मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले. वाचा सविस्तर..
- जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य