आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
1) आज महापरिनिर्वाण दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Day) लाखो आंबेडकर अनुयायी देशभरातून चैत्यभूमी येथे दाखल होतात. दोन दिवस आगोदरच या वास्तूजवळ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येऊ लागतात. बाबासाहेब यांना मानणारा प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जातीचा असो, तो या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. ६ डिसेंबरच्या (6 December Mahaparinirvan Day) रात्रीपर्यंत तसेच वातावरण असते.
२) ऋषिकेश देशमुख यांच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांच्या याचिकेवर आज पुन्हा मुंबई विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबई - जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन म्युटेशनचा प्रसार होऊ लागला आहे. राज्यात कालच डोंबिवलीमधील एका व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये ६ तर पुण्यात १ रुग्ण, आळंदी 1 आणि एक डोबिंवलीत (Omicron Patient Found In Pune) आढळून आले आहे. यामुळे राज्यातील ओमाक्रॉन रुग्णांची (Omicron Variant In Maharashtra) संख्या 9 झाली आहे. आज आढळून आलेल्या सात रुग्णांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने (State Health Department) दिली आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - कोरोना विषाणूचा ओमायक्रोन ( Omicron in Maharashtra ) या नवीन व्हेरियंटच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत मुंबईत 4 हजार 227 परदेशी प्रवासी आले असून त्यापैकी 19 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह ( Corona Updates in Maharashtra ) आढळून आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग ( Genome Sequencing Test ) चाचण्यांमध्ये 8 जणांना ओमायक्रॉन ( Omicron Variant ) विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - दोनशे कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Accused Sukesh Chandrashekhar) सोबतच्या संबंधामुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. काही कामानिमित्त देशाबाहेर निघालेल्या जॅकलिनला रविवारी (ता. ५ डिसेंबर) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुंबई विमानतळावरच (Mumbai Airport) थांबवले आहे. सविस्तर वाचा..
पुणे - राज्यातील ओमायक्रॉनचा पाहिला रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर आज पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आणखीन 6 तर पुण्यात एकाला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला आहे. (Omicron Variant in pune) यामुळे शहरासह राज्यात देखील (Omicron virus in Maharashtra) चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Day) लाखो आंबेडकर अनुयायी देशभरातून चैत्यभूमी येथे दाखल होतात. दोन दिवस आगोदरच या वास्तूजवळ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येऊ लागतात. बाबासाहेब यांना मानणारा प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जातीचा असो, तो या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. ६ डिसेंबरच्या (6 December Mahaparinirvan Day) रात्रीपर्यंत तसेच वातावरण असते. सविस्तर वाचा..
मुंबई - विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या एका महिन्यापासून ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुनही कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने (St Workers Strike) अखेर संपकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. महामंडळाने आतापर्यत एकूण ९ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरीही कर्मचारी कामावर हजर होत नाही. यामुळे संपात सहभागी होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा बदल्याचा फतवा एसटी महामंडळाकडून काढण्यात आलेला आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांची गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. सविस्तर वाचा..
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
VIDEO : 06 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
6 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज कार्यपूर्तीसाठी चालना मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य