आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
१) आजपासून मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात
नाशिकमध्ये 3 ते 5 डिसेंबर दरम्यान मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन आजपासून सुरू होणार आहे.
२) आज आर्यन खानची चौकशी
आज आर्यन खान एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार.
३) मुंबई आज महापालिकेच्या स्थायी समितीची सभा
सभेत नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे लहान बाळाच्या झालेल्या मृत्यूवरून विरोधक सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता.
४) मुंबई पाऊस पडण्याची शक्यता
आज मुंबई पाऊस पडण्याची शक्यता आहे.
५) आज बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता
पूर्व किनारपट्टीलाही 'जवाद' चक्रीवादळाचा इशारा ( Jawad Cyclone Warning For Maharashtra ) देण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्ट्यांवर सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने ( Indian Meteorological Department ) चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. शनिवारी हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून संपल्यानंतर हे पहिलेच चक्रीवादळ आहे. आज (शुक्रवारी) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ( Bay of Bengal Central ) निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबई - राज्यात ( Maharashtra Corona Update ) आज गुरूवारी 796 नव्या रुग्णांची ( New Corona Cases in Maharashtra ) नोंद झाली आहे. 24 रुग्णांचा मृत्यू ( New Corona Cases ) झाला आहे. तर 952 रुग्णांना डिस्चार्ज ( Corona Discharged Patients ) देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - ओमायक्रॉन (Omicron Variant) विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्याने विमान प्रवाशांसाठी नियमावली जाहीर (Air Travel Guidelines) केली होती. केंद्र शासनाने (Center Government) यावर हरकत घेत, नियमात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने नव्याने परिपत्रक जाहीर (Maharashtra revises air travel guidelines) करत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे राज्य आणि केंद्रामध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा..
दक्षिण आफ्रिकेत (New corona Variant in South Africa) कोरोनाचा नवा ओमायक्रोन व्हेरियंट (Omicron New Corona Variant) आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC Precautions) देशाबाहेरून आलेल्या २८६८ प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. त्यापैकी ४ प्रवासी आणि १ जण त्यांच्या सहवासातील असे एकूण ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सविस्तर वाचा..
जालना - कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यात ( MH gov measures on omicron ) उपाययोजना सुरू आहेत. सध्या केंद्र सरकार नवीन निर्बंध लादणार नाही. परिस्थितीनुसार केंद्र निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्र ठरवेल ते निर्बंध राज्यात लावले जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी ( Rajesth Tope on restrictions in threat of omicron ) माध्यमांशी बोलताना सांगितले. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली - भारतात ओमायक्रॉन ( Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण (Two cases of Omicron Variant in karnatak) आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Former Police Commissioner Param Bir Singh ) यांना आज (गुरुवारी) राज्य सरकारकडून निलंबित ( Suspended by State Government ) करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर परमबीर सिंग यांचे अखेर निलंबित करण्यात आले आहे. या संबंधीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला ( Union Home Ministry ) पाठवण्यात येणार आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचा वातावरण असतो. मात्र सध्या या वातावरामध्ये पावसाने हजेरी लावल्याने स्वेटर घालून छत्रीचा वापर करायचा का? असा प्रश्न सध्या राज्यातील जनतेला पडला आहे. कारण एकीकडे रिमझिम पडणारा पाऊस तर दुसरीकडे अंगाला टोचणारी बोचरी थंडी यामुळे काय करावे, हेच सध्या मुंबईकरांना कळत नाही आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने ( Rainfall in Many Districts of the State ) झोडपून काढले. पूर्व किनारपट्टीलाही 'जवाद' चक्रीवादळाचा इशारा ( Jawad Cyclone Warning For Maharashtra ) देण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्ट्यांवर सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने ( Indian Meteorological Department ) चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. शनिवारी हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा..
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
VIDEO : 03 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य