आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
1) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर
पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Cm Mamata Banerjee) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) आहे. काल सायंकाळी साडेसात वाजता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) आणि शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती.
२) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शरद पवार यांना भेटणार
आज (बुधवारी) एक डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार. या बाबत त्यांनी काल माहिती दिली होती.
३) राज्यातील प्राथमिक शाळांची घंटा आज वाजणार
राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने राज्य सरकारने (State Government) १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.
४) राज्याच्या काही भागांत आज पावसाची शक्यता
थंडीत राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्याच्या काही भागांत आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने ( Chance of Rain in MAHA ) वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने वातावरणात बदल झाला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पुढील २ दिवस ( Rain with Thunderstorm in next २ days ) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
५) पुण्यातील शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद
राज्य सरकारने एक डिसेंबरला पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे, मात्र मुंबई महापालिकेने कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका पाहता शाळा १ तारखेपासून सुरू होणार नसल्याचे जाहीर केले. पुणे शहरातही काल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मनपा हद्दीतील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा ( Schools in Pune ) १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली.
६) आज जागतिक एड्स दिन
काय आहे एचआयव्ही?
एचआयव्ही म्हणजे 'ह्यूमन इम्युनोडेफिशियन्शी व्हायरस' होय. हा व्हायरस व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. एचआयव्ही बाधिताची हेळसांड न करता कॉलरा, मलेरिया, कर्करोग, क्षयरोग आदी आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांकडे आपण जसे बघतो तसाच दृष्टिकोण एचआयव्ही बाधित रुग्णांकडे ठेवणे गरजेचे आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबई - युरोप तसेच साऊथ आफ्रिका येथे ओमीक्रोन ( Omicron Corona new Variant ) हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. याच दरम्यान राज्यात आफ्रिका अथवा इतर जोखमीच्या देशातून आलेले 6 प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत. कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि पुणे या भागात आफ्रिका आणि इतर जोखीमच्या देशातून आलेला प्रत्येकी एका प्रवाशाला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नायजेरियातून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Cm Mamata Banerjee) दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) आहे. सायंकाळी साडेसात वाजता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) आणि शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांची देखील भेट घ्यायची होती. मात्र मुख्यमंत्र्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मुख्यमंत्री अद्यापही बायोबबलमध्ये असल्यामुळे त्यांची भेट ममतादीदींशी होऊ शकली नाही, अशी माहिती भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. सविस्तर वाचा..
मुंबई - राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) यांच्या मुदतवाढीला केंद्र सरकारने नकारघंटा दर्शवल्याने मुख्य सचिव पदी देबाशीष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चक्रवर्ती हे १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. दरम्यान, विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारने केंद्राला जेरीस आणले आहे. कुंटे यांची मुदतवाढ नाकारून केंद्राने राज्य सरकारचा वचपा काढल्याचे बोलले जात आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - मराठा आरक्षण आंदोलनातील ( Maratha Reservation Agitation ) मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबीयांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - थंडीत राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्याच्या काही भागात आज आणि उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने ( Chance of Rain in MAHA ) वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने वातावरणात बदल झाला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पुढील 3 दिवस ( Rain with Thunderstorm in next 3 days ) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. उद्या पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा ( Orange alert in Maharashtra Four districts) इशारा देण्यात आला असल्याचे हवामान तज्ञ शुभांगी भुत्ते यांनी सांगितले. सविस्तर वाचा..
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
1 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज व्यवसायात फायदा होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
VIDEO : 01 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य