ETV Bharat / bharat

आज काँग्रेस देशभर साजरा करणार 'किसान विजय दिवस'... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

टॉप न्यूज
टॉप न्यूज
author img

By

Published : Nov 20, 2021, 5:55 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज काँग्रेस साजरा करणार 'किसान विजय दिवस'

केंद्र सरकारच्या कृषी कायदे निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांच्या चिकाटी आणि उत्साही लढ्याला सलाम करण्यासाठी आज काँग्रेस देशभरात ‘किसान विजय दिवस’ साजरा करणार आहे.

  • भाजपा नेते किरीट सोमैयांना आज नागपूर सत्र न्यायालयात हजर राहावे लागणार

भाजपचे नेते किरीट सोमैया यांना सत्र न्यायालयाने समन्स बजावत आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमैयांविरोधात मानहानीचा आरोप करीत दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल केली आहे.

  • स्वाभिमानीचे आज 'गाव बंद आंदोलन'

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गाव बंदची हाक दिली आहे.

  • ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

मनी लॉन्ड्रीग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

पालघर - केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे ( repealing agricultural laws) मागे घेतले आहेत. हे शेतकऱ्यांचे यश असल्याचे मत शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी व्यक्त केले आहे. तर एमएसपीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहील, असा राकेश टीकैत यांनी इशारा दिला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.सविस्तर वाचा...

बुलडाणा - सोयाबीनला 8 हजार तर कापूसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे गेल्या तीन दिवसापांसून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन (Tupkar's agitation) सुरु आहे. याच आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले आहे. दरम्यान शुक्रवारी (काल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेख रफीक शेख करीम यांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलन मंडपासमोरच स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु तेथे उपस्थित पोलीस व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना वेळीच आवरले. यावेळी कार्यकर्त्यांचा संयम सुटला. काही कार्यकर्त्यांनी येथील चिखली रोड बंद केला. रस्त्यावर बसून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली.सविस्तर वाचा...

भंडारा - शरद पवार(NCP Chief Sharad Pawar) यांच्यासारखे नेते केव्हाचे काँग्रेस(Congress) सोडून गेलेत. आता काँग्रेस केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला आहे. काँग्रेस पक्षातील निर्णय हायकमांड घेतात. मात्र, आमच्या घरात काय सुरूये हे आम्हालाच माहिती आहे. दुसऱ्यांना हे कसे कळणार. त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress State President Nana Patole) यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाचे निर्णय सोनिया गांधी(Sonia Gandhi) घेतात असे वक्तव्य गुरुवारच्या एका सभेत शरद पवार यांनी केले होते.सविस्तर वाचा...

मुंबई - खंडणी वसुली प्रकरणात फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh Extortion Case) यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त (Parambir Singh Property) करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँच याप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरोधात ही कारवाई करण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांची कोट्यवधीची संपत्ती असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यातील काही संपत्तीची कागदपत्रेही क्राईम ब्रँचला मिळाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी परमबीर यांना फरार घोषित केले आहे. फरार घोषित झाल्यापासून 30 दिवसांपर्यंत जर परमबीर पोलिसांना शरण आले नाही तर त्यांच्या संपत्तीवर जप्त येण्याची शक्यता आहे. (Mumbai Crime Branch over Param Beer Singh) सविस्तर वाचा...

गडचिरोली - कोरची तालुका-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील मर्दिनटोला जंगलात झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. (Milind teltumbde's dies in encounter) मात्र, या घटनेच्या निषेधार्थ माओवादी कम्युनिस्ट पक्षाने २७ नोव्हेंबरला सहा राज्यांमध्ये बंदचे आवाहन केले आहे. (Maharashtra band appealed)सविस्तर वाचा...

अमरावती - शहरात झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी (Amravati Curfew) लावण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये फक्त अत्यावश्यक दुकानांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मागील सहा दिवसांपासून बंद आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेतकर्‍यांना (Amravati Curfew Impact) बसत आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि या हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. परंतु बाजार समितीच बंद असल्याने सोयाबीन व आदी शेतमाल विकावा तरी कुठे? असा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे तत्काळ बाजार समिती सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहे.सविस्तर वाचा...

जयपूर - राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. कारण, गेहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. जयपूरमध्ये पोहोचल्यानंतर अजय माकन (Ajay Maken) यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते माकन म्हणाले, की आरोग्य मंत्री रघु शर्मा (Raghu Sharma), शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा (Govind Singh Dotasara) आणि महसूल मंत्री हरीश चौधरी (Harish Choudhary) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शविणारे पत्र ( Rajasthan three cabinet ministers resigned) लिहिले आहे. हे पत्र राजीनामा मानले जात आहे. या नेत्यांना काँग्रेसने नवीन जबाबदारी सोपविली आहे.सविस्तर वाचा...

अहमदनगर - केंद्र सरकारने तीन कृषी कायदे संमत केल्याच्याविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन सुरू आहे. (delhi farmers agitation) यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राने केलेले कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली. (pm modi announcement over farm law) पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रिया येत असून यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. (anna hajare reaction on farm law repealed)सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.