आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- देशात आज कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव साजरा होत आहे.
- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्बंध असताना विरोधकांकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
- आज शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत.
- उपराष्ट्रपती आज खादी इंडिया प्रश्न मंजुषेचा शुभारंभ करतील.
- नागपूरमध्ये आज कॉंग्रेसची पत्रकार परिषद होणार आहे.
- राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
- ठाणे - ठाण्यात एकीकडे अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या हातावरील बोटांवर चाकूने हल्ला झाला असून त्यांची बोटे छाटल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पिंपळे यांना तत्काळ घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे. दरम्यान, अमरजीत यादव असे या हल्लेखोर भाजी विक्रेत्याचे नाव आहे. या घटनेमुळे ठाण्यातील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा
- ठाणे - पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर हल्ला झाल्यानंतर मनसेकडून आता 'फेरीवाला हटाओ' मोहीम सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान मनसेने सर्व पालिका आवारातील सर्व हातगाड्या पळवून लावल्या आहेत. हे सर्व फेरीवाले परप्रांतीय असून यांना आळा घालण्यासाठी हे आंदोलन पुन्हा हाती घेण्यात आले आहेत. ठाण्यात कुठेही फेरीवाले दिसले की त्यांना पळवून लावू, इथे फेरीवाल्याचा सुळसुळाट असून यावर काही अधिकाऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून असल्याचा आरोप मनसेचे महेश कदम यांनी केला आहे. सविस्तर वाचा
- मुंबई - अनियमित वेतनामुळे एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचार्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. मंत्री परब यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री यांचे जवळचे समजले जातात अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि परब यांचे नाव प्रामुख्याने घेत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा रविवारी शेवट झाला. त्यानंतर काही तासातच परब यांना इडीची नोटीस आली. या नोटिसीनंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. सविस्तर वाचा...
- वाशिम - भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमैया यांनी खासदार भावना गवळी यांनी शंभर कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप वाशिम येथील पत्रकार परिषदेत केला होता. यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानुसार आज (सोमवार) सकाळी ईडीचे पथके त्या चौकशीसाठी वाशिम जिल्ह्यात दाखल झाले होते. सकाळपासून साई डोमेस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, साई भूमी कन्स्ट्रक्शन, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, साईस्थान डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, दानिश इन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेडमधील विविध दस्तऐवजाची सोमवारी 11 वाजतापासून तपासणी सुरू होती. सोमवारी सायंकाळचे 8 वाजतापर्यंत ईडीचे अधिकारी व कर्मचारी चौकशी करत होते. अजूनही चौकशी बाकी आहे का? याबद्दल अधिकारी यांनी बोलण्यास नाकार दिला आहे. भावना गवळी यांच्यावरील आजची कारवाई संपली असून उद्या (मंगळवार) पून्हा चौकशी होते का? हे बघावे लागणार आहे. सविस्तर वाचा...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -