आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- देशभरात आज जन्माष्टमी साजरी केली जाणार, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक निर्बंध सरकारकडून लावण्यात आले आहे.
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोर्टाने आज अलिबाग एनसीपीकडे हजेरी लावण्याचा आदेश घालून दिला होता. त्यानुसार आज नारायण राणे अलिबाग पोलीस स्टेशनला एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे.
- राज्यातील मंदिरे पूर्णत: खूली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी अक्कलकोट तालुका व शहर यांच्या वतीने आज सकाळी ११:०० वाजता स्वामी समर्थ मंदिरासमोर शंख वाजवून आंदोलन होणार आहे.
- जुलै महिन्याचे वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आज मुंबई आगाराबाहेर आंदोलन करणार आहेत. संघर्ष एसटी कामगार युनियन या संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.
- आजपासून राज्यात पुढील काही दिवस सर्वदूर पाऊस
- अकरावी प्रवेश : आज जाहीर होणार तिसरी गुणवत्ता यादी
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबई - परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. विशेष म्हणजे याआधीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून परब यांना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती दिली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.सविस्तर वाचा...
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पुन्हा रॉकेटहल्ला झाला आहे. हा स्फोट हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झाला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यात एका लहान मुलाचेही निधन झाल्याचे अफगाण पोलीस प्रमुखांनी सांगितले. अमेरिकेने काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हजारो लोकांना बाहेर काढलेले ऐतिहासिक विमान उडवल्याने हा हल्ला झाला.सविस्तर वाचा...
नागपूर - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. यासंदर्भात राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात बोलताना मला याबाबत कल्पना नाही, सीबीआय असो किंवा ईडी या एजन्सी त्यांच्या परीने काम करतात. त्यांनाच विचारा, असे ते म्हणाले.सविस्तर वाचा...
मुंबई - शहरातील चेंबूर येथील चिल्ड्रन होममधील 18 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमामध्ये 22 जणांना कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.सविस्तर वाचा...
ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय सामाजिक विकास राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणात व्यक्त केले. कल्याणातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी ते कल्याणात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.सविस्तर वाचा...
मुंबई - मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामधील अभ्यासक्रमाचा प्रवेशाची पहिली आणि दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आता सोमवारी तिसरी यादी उद्या जाहीर होणार आहे. पहिला आणि दुसर्या गुणवत्ता यादीत नामांकित महाविद्यालयांच्या जागा भरल्यामुळे तिसर्या यादीत विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.सविस्तर वाचा...
नाशिक - देशात शेतकऱ्यांच्या बाजूने बोलले तर निलंबन होते. मोदी सरकार भांडवलदार धार्जिण कायदे करत असून त्यांनी रेल्वे विकायला काढली, एलआयसीचे खासगीकरण केले. या देशात विकणारे दोघे अन् घेणारे दोघेच असून त्यांना ठराविक लोकांच्या ताब्यात देश द्यायचा आहे, असा आरोप करत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर नाशिक येथे सडकून टीका केली आहे.सविस्तर वाचा...
मुंबई - रविवारचा दिवस उजाडला आणि राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली ती म्हणजे अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आलेली आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये खंडणी वसुलीचे आरोप आहेत. याचा तपास सीबीआयसुद्धा करत आहे. समाज माध्यमांवर एक सीबीआय डॉक्युमेंट्स व्हायरल झाले आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिले असल्याचे सांगितले होते. मात्र सीबीआयकडून एक माहिती प्रसारित करण्यात आली आहे, यामध्ये सीबीआयकडून कोणत्याही प्रकारची क्लीनचिट दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.सविस्तर वाचा...
टोकियो - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये आज रविवारी भारताने दुसरे पदक जिंकले. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने सकाळी रौप्य पदक जिंकले. यानंतर आता उंच उडीत अॅथलिट निषाद कुमार याने रौप्य पदकाला गवसणी घातली.सविस्तर वाचा...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
30 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज व्यवसायात लाभ होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य