ETV Bharat / bharat

महाराष्ट्रात झिकाचा शिरकाव : टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर - आज दिवसभरात

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
टॉप न्यूज
author img

By

Published : Aug 1, 2021, 6:02 AM IST

  • आज दिवसभरात/आजपासून -

कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा आजपासून पुन्हा सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा 1 ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहे. रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ही विमानसेवा सुरू राहणार आहे. कोल्हापुरातून अनेक भाविक तिरुपतीला जात असतात.

आजपासून बँकांशी निगडित नवीन नियम लागू होणार

मुंबई - रिझर्व्ह बँकेने बँकांशी निगडित काही नियम बदलले आहेत. हे नवीन नियम आजपासून सर्व बँकांना लागू होणार आहेत. या नवीन नियमानुसार सुट्टीच्या दिवशीही पगार खात्यावर जमा होणार आहे. तसेच IPPB शुल्क आकारणार आहे. तसेच ICICI बँकदेखील काही शुल्कांमध्ये वाढ करणार आहे.

भारत आणि रशियामधील 12 वा संयुक्त लष्करी सराव आजपासून सुरू

नवी दिल्ली - भारत आणि रशिया या देशांचा 12 वा संयुक्त लष्करी सराव आजपासून सुरू होत आहे. 1 ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत हा संयुक्त लष्करी सराव रशियामध्ये वोल्गोग्राद येथे होणार आहे.

आज भारत विरुद्ध ब्रिटेन हॉकी संघाचा क्वॉर्टर फायनलचा सामना

टोक्यो - भारतीयांसाठी आज सुपर संडेचा महत्त्वाचा सामना पुरुष हॉकी संघाचा क्वॉर्टर फायनलचा सामना असेल. भारतीय हॉकी संघ तब्बल 41 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. क्वॉर्टर फायनलमध्ये भारताचा सामना ग्रेट ब्रिटेनसोबत असेल. ग्रेट ब्रिटन संघाची आतापर्यंतची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. पण भारतानेही चुरशीची टक्कर दिल्याने उद्याचा सामना चुरशीचा होईल हे नक्की.

बॉक्सिंग रिंगमध्ये आज भारतीय खेळाडू सतॉश कुमारचा सामना

टोक्यो - हॉकीसह रविवारी बॉक्सिंग रिंगमध्येही भारतीय खेळाडू सतॉश कुमार जिंकण्यासाठी उतरेल. सतिश ओलिम्पिकमध्ये त्याचा डेब्यू करत असून राष्ट्रीय पातळीवर त्याने चांगली कामिगिरी केल्याने त्याच्याकडून विजबॉक्सिंग रिंगमध्येही भारतीय खेळाडू सतॉश कुमारयाची अपेक्षा केली जात आहे. हॉकी आणि बॉक्सिंगसह भारत उद्या काही अॅथलेटिक्सच्या स्पर्धांमध्येही सहभाग घेईल.

  • वाचा, टाॅप न्यूज -

महाराष्ट्रात झिकाचा आढळला पहिला रुग्ण, पुरंदर तालुक्यातील 50 वर्षीय महिलेला लागण

मुंबई - कोरोनाच्या संकटातून जाणाऱ्या महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही झिकाची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील 50 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली आहे. या महिला रुग्णाची तब्येत चांगली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

अतिवृष्टीमुळे सुमारे १७ हजार कुटुंब बेघर; नुकसानभरपाईचा आकडा वाढण्याची शक्यता

मुंबई - राज्यात आलेल्या पूरस्थितीचा फटका सुमारे १७ हजार कुटुंबांना बसला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने बाधित कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. तर मृतांच्या नातेवाईकांना पाच कोटी रुपये देण्याचे नियोजन राज्य शासनाने आखले. त्यामुळे पूर व दरडीमुळे ३५ कोटींचे सरासरी नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. शेती, फळबागा उद्योग धंदेसहित आदीच्या नुकसानभरपाईचा आकडा वाढला जाणार आहे.

महाराष्ट्रासह 10 राज्यांमधील पॉझिटिव्हिटीचा दर मागील आठवड्यांच्या तुलनेत जास्त -राजेश भुषण

नवी दिल्ली - देशातील 10 राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण आणि पॉझिटिव्हिटीचा दर वाढत आहे. याबाबतच्या स्थितीचा आढावा आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी शनिवारी घेतला आहे. 10 राज्यांमधील पॉझिटिव्हिटीचा दर हा मागील आठवड्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे कठोर निर्बंध, लोकांचा प्रवास, गर्दी यावर नियंत्रण आणण्याची गरज आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

आझादी के ७५ साल - स्वातंत्र्य आंदोलनाचे साक्षीदार असलेले 'मणि भवन'!

मुंबई - भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. या पैकी महात्मा गांधी यांनी छेडलेल्या असहयोग, सविनय कायदे भंग, दांडी यात्रा आदी आंदोलने करताना महत्वपूर्ण अशा बैठका मुंबईमधील 'मणि भवन' या वास्तूत झाल्या. गांधीजींना याच भवनमधून अटक झाली हा इतिहास बहुतेकांना माहीत असेल. मात्र याच भवनमध्ये वास्तव करताना महात्मा गांधीजींच्या पेहरावात बदल झाला. याच ठिकाणी गांधीजीं चरखा चालवायला शिकले, अशी माहिती मणि भवन गांधी संग्रहालयाचे कार्यकारी सचिव मेघश्याम आजगांवकर यांनी दिली.

नागपुरातील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्र्यांनी मागितली गडकरींची मदत

नागपूर - महाराष्ट्रात नैसर्गिक संकटाने आलेल्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते आणि पूल खराब झाले आहे. पण आता नवे रस्ते बांधताना पुढच्या पिढ्यांसाठी टिकले पाहिजे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहायाने ते केले पाहिजे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीची गरज असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते नागपुरात महारेलच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

  • वाचा, INTERESTING स्टोरी -

गोरगरीब मुलांसाठी झाडाखाली भरते शाळा; सोलापुरातील मनपा शाळेचा स्तुत्य उपक्रम

सोलापूर - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी शाळांचे वर्ग बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण व्यवस्था उदयास आली. मात्र, स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप सर्व विद्यार्थ्यांकडे किंवा पालकांकडे असेलच याची शास्वती नाही. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साधने नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सोलापुरातील रामवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी गृहभेट आणि झाडाखाली वर्ग सुरू केले आहेत.

VIDEO - रस्त्याने चालणाऱ्या माणसाच्या पायाला सापाने घातला वेटोळा!

पाहा व्हिडिओ
  • जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य -

1 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांनी आज अविचारी निर्णय घेऊ नये; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.