आज ज्या बातम्यांवर राहील नजर -
- शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; सांगोल्यात आज होणार अंत्यसंस्कार
सोलापूर - शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते सांगोला मतदारसंघाचे 55 वर्षे आमदार होते. शनिवारी सकाळी सांगोला येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वाचा, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन
- मुख्यमंत्री आज पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्याची शक्यता
मुंबई - मागील आठवड्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागांमध्ये पूर आला होता. यामध्ये अनेकांचे जीव गेले असून, संसार उघड्यावर आले आहेत. पूरग्रस्त भागांची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आज पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. वाचा, काय म्हणाले मुख्यमंत्री -
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद
मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. फडणवीस यांनी नुकताच पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. वाचा, पूर्ण बातमी -
- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पुणे दौऱ्यावर
पुणे - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सध्या पुण्यातील डीसीपी महिलेच्या बिर्याणीसंदर्भातली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्याअनुषंगाने गृहमंत्री काही कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा, प्रकरण काय?
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
1. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; राजकीय नेत्यांकडून आठवणींना उजाळा
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आठवणींना उजाळा..मान्यवरांच्या प्रतिक्रिया
2. सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले, हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली
3. पॅकेज म्हणा किंवा मदत म्हणा, पण पूरग्रस्तांना आता मदतीची आणि त्यांना आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना जे म्हणायचे ते म्हणा पण मदत जाहीर करा, असे उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर
4. मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एवढं मोठं संकट असतानाही राज्य शासनाने कोणतेही पॅकेज जाहीर केले नसल्याची टीका विरोधकांनी केली होती, यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावत आपण पॅकेज नाही तर, मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना उत्तर -
5. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी हैदराबाद शहरामधील जीनोम व्हॅलीमधील भारत बायोटकच्या उत्पादन केंद्राला बेट दिली. यावेळी तेलंगाणाचे गृहमंत्री मोहम्मद महमुद अलीदेखील उपस्थित होते. नायडू यांनी कोव्हॅक्सिन उत्पादन प्रक्रियेला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या भारत बायोटेक आणि शास्त्रज्ञांचे कौतुक केले. भारत बायोटेककडून 4 अब्ज कोव्हिड लशीचे जगभरात वाटप - व्यकंय्या नायडु
6. मोदी सरकारविरोधात विरोधकांची फळी एकजूट होत आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राजकीय हेतुसाठी हे भेट झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ममता बॅनर्जी-शरद पवार भेट, वाचा, कारण काय?
विशेष मुलाखत -
हॉस्टस्टार प्रीमिअरवर नुकतीच सिटी ऑफ ड्रीम्सचा दुसरा सीजन रीलिज झाला आहे. या सिरीजमध्ये नेमके प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे, कसा असेल हा दुसरा सीजन याबाबत ईटीव्ही भारतने सिरीजमधील कलाकार प्रिया बापट आणि एजाज खान यांच्याशी संवाद साधला. पाहा, ते काय म्हणाले? स्क्रीप्ट हेच माझे दैवत, दिग्दर्शक हेच माझे गुरू पाहा...प्रिया काय बोलत्येय
मीराबाई चानूसोबत ईटीव्ही भारतने केलेली विशेष बातचीत -
रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू क्लीन अॅण्ड जर्कमध्ये वजन उचलू शकली नाही. यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. परंतु ती खचली नाही. तिने कठोर सराव करत टोकियो ऑलिम्पिक गाठलं आणि रौप्य पदक जिंकलं. मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाचे खाते उघडले. रिओमधील अपयशानंतर टोकियोत पदक जिंकायचेच हे वचन स्वत:ला दिलं होतं