ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसीय ब्रिटन दौऱ्यावर.. दिवाळीची सुरूवात अन् अभिनेत्री ऐश्वर्या रायचा वाढदिवस, वाचा ईटीव्ही भारत टॉप न्यूज

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
top news
author img

By

Published : Nov 1, 2021, 6:19 AM IST

आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ज्यांच्यावर असेल देशाची नजर -

आज वसु-बारस.. दिवाळीची आजपासून सुरूवात

मुंबई - भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली - पीएम मोदी G20 शिखर संमेलनसाठी रोम, इटलीची तीन दिवसीय दौरा आटोपून ब्रिटनच्या ग्लासगोसाठी रवाना झाले आहे. १ व २ नोव्हेंबर असे दोन दिवस ते ब्रिटन दौऱ्यावर असतील. मोदी दोन दिवस ग्लासगो येथे राहतील व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये द्वीपक्षीय संबंध व हवामान बदलांबाबत चर्चा होईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आज गोवा दौऱ्यावर

पणजी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आजपासून दोन दिवशीय गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी सकाळी त्यांचे आगमन होईल, त्यांनतर ते गोव्यातील महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. सोबतच महाराष्ट्र गोमंतक पक्षाशी युतीबाबत चर्चा ही होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आजपासून दोन दिवशीय गोवा दौऱ्यावर येत आहेत. या भेटीत ते गोव्यातील विविध नेते व कार्यकर्त्यांशी विभागवार भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

आज जागतिक वीगन दिवस

1 नोव्हेंबरला संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड वीगन डे साजरा केला जातो. वीगनमध्ये फळभाज्या, धान्य, कडधान्ये, डाळी, ड्रायफ्रूट्स या गोष्टींचा समावेश होतो. वीगन डे हा शाकाहारीचाच एक प्रकार आहे. शाकाहारी चळवळ ही अनाधी काळापासून सुरू आहे. 1994 साली पहिल्यांदा याच शाकाहारी चळवळीचा एक भाग म्हणून वेगन चळवळ सुरू करण्यात आली. प्राणी अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्ही. फिलिप्स नावाच्या एका व्यक्तीने ही वीगन चळवळ सुरू केली.

अभिनेत्री अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचा आज वाढदिवस

बॅालिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आज ( 1 नोव्हेंबर) तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. ऐश्वर्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा फक्त भारतातच नाहीतर जगभरात आहे. एश्वर्या बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री आहे, जिचा मेणाचा पुतळा लंडनच्या मॅडम तुसाद येथे लावण्यात आला आहे. ऐश्वर्याचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी कर्नाटकमधील मंगळुरू येथे झाला.

काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या -

100 कोटी वसुली प्रकरणात CBI कडून पहिली अटक.. आता नवीन खुलासे होण्याची शक्यता

मुंबई - 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी सुरू असलेल्या सीबीआय तपासातील पहिल्या आरोपीला आज (रविवारी) अटक करण्यात आली आहे. संतोष जगताप नावाच्या मध्यस्थाला सीबीआयने ठाण्यातून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.आरोपी संतोष जगतापला आता सीबीआयने अटक केली असून त्याला चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

वाचा सविस्तर - 100 कोटी वसुली प्रकरणात CBI कडून पहिली अटक.. आता नवीन खुलासे होण्याची शक्यता

T20 World Cup IND vs NZ : आयसीसी स्पर्धेतील विजयी परंपरा न्यूझीलंडकडून कायम.. भारताचा लाजीरवाणा पराभव

दुबई - आयसीसी स्पर्धेतील आपली विजयी परंपरा कायम ठेवत न्यूझीलंडने टीम इंडियाला पुन्हा एकदा लोळवलं. या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडियासाठी उपांत्यपूर्ण फेरीत पोहचण्याची आशा धुसर झाली आहे.भारताने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 110 धावा केल्या. या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने 8 विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला आहे.

वाचा सविस्तर - T20 World Cup IND vs NZ : आयसीसी स्पर्धेतील विजयी परंपरा न्यूझीलंडकडून कायम.. भारताचा लाजीरवाणा पराभव

गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के.. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, जीवित व वित्तहानी नाही

गडचिरोली - जिल्ह्यात रविवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रविवारी संध्याकाळी ६.४८ वाजता जिल्ह्यातील सिरोंचा परिसरालगत भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. हवामान खात्याच्या सेस्मॉलॉजी विभागाने या भूकंपाला दुजोरा दिला आहे.

वाचा सविस्तर - गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के.. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, जीवित व वित्तहानी नाही

World Vegan Day.. जाणून घ्या काय आहे संकल्पना व सामान्य शाकाहारींपेक्षा कसा वेगळा असतो वीगन डायट

1 नोव्हेंबरला संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड वीगन डे साजरा केला जातो. वेगनमध्ये फळभाज्या, धान्य, कडधान्ये, डाळी, ड्रायफ्रूट्स या गोष्टींचा समावेश होतो. हा वीगन डे का साजरा केला जातो. यामागचा प्रमुख उद्दिष्ट काय आहे हे आपण जाणून घेऊया..

वाचा सविस्तर - World Vegan Day.. जाणून घ्या काय आहे संकल्पना व सामान्य शाकाहारींपेक्षा कसा वेगळा असतो वीगन डायट

बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्यात गती; बीकेसी ते कल्याण भुयारी मार्गाकरीता निविदा प्रक्रिया सुरु!

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रकल्प असलेल्या देशातील पहिल्या अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम भूसंपादन न झाल्याने बुलेट ट्रेन प्रकल्प रखडत होता. मात्र आता या प्रकल्पाचा कामाला राज्यात गतीने मिळण्यास सुरुवात झाली. नुकताच नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशने वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते कल्याण शिळफाटा या २१ किलाेमीटर लांबीच्या भुयारी मार्गाकरीता निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत मार्च २०२२ असणार आहे.

वाचा सविस्तर -बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्यात गती; बीकेसी ते कल्याण भुयारी मार्गाकरीता निविदा प्रक्रिया सुरु!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.