हैदराबाद - भारताने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा ( Miss Universe Harnaz Sandhu ) किताब पटकावला आहे. पंजाबच्या हरनाझ संधूने मिस युनिव्हर्स ( Miss Universe Harnaz Sandhu ) ही सौंदर्यस्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यात 75 हून अधिक सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी भाग घेतला होता, मात्र तीन देशांतील महिलांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले, त्यापैकी एक भारताची हरनाझ संधू होती. दक्षिण आफ्रिका आणि पॅराग्वे या दोघांनाही मागे टाकून भारताच्या हरनाझ संधूने वैश्विक सौंदर्याचा मुकुट पटकावला. त्यानिमीत्ताने 'ईटीव्ही भारत'च्या रिपोर्टर मानसी जोशी यांनी दूरदृष्यप्रणीद्वारे तिच्याशी संवाद ( Exclusive Interview With Harnaaz Sandhu ) साधला. यावेळी, मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने ( Miss Universe Harnaz Sandhu ) संयम आणि मेहतीने काम करा. यश तुमचेच आहे. अपयशाने खचून जाऊ नका, त्यातून काही शिका, असा सल्ला तरुणांना दिला.
मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यावर तुझी भावना काय होती?
पहिल्यांदा माझे नाहीतर माझ्या देशाचे नाव पुकारले जात होते, हा माझ्यासाठी अभिमानास्पद असा क्षण होता. गेल्या कित्येक दिवसांपासून याची वाट मी पाहत होते. जेव्हा पुढील मिस युनिव्हर्स भारताची आहे, असे म्हटलं गेलं तेव्हा मला खुप गर्व वाटला. मला रडू कोसळले. हा क्षण संपुर्ण देश पाहत होता. देशवासीयांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेल्या पाठींब्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी तू कशाप्रकारे तयारी केली?
मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी माझ्याकडे फक्त 30 दिवसांचा कालावधी होता. हे एकप्रकारे माझ्यासाठी आव्हानात्मक होते पण अशक्य नव्हते. दररोज डाएट, मेक-अप, हेअर, जीम, ट्रेनिंग तसेच वेगवेगळ्या शूटींग, बैठका असायच्या. मी केलेलं हे कष्ट माझ्या कामाला आले.
तु चंदीगडच्या रहिवाशी आहात.. चंदीगडने हरनाझला काय दिले..?
माझे सर्व शिक्षण चंदिगडमध्ये झाले. तिथे पंजाब, हरियाणा, शिमला अशा विविध राज्यातील गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. त्यामुळे ते मला खूप आवडते. सध्या मी चंदीगडला जाण्यासाठी खूप उत्सुक आहे.
मॉडेलिंगमध्ये येताना कुटुंबाचा पाठिंबा होता का?
मला प्रत्येक गोष्टीत कुटुंबाने साथ दिली आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत मी देशाची शान बनेल असा विश्वास त्यांना होता. माझी आई स्त्रीरोगतज्ज्ञ असून ती चांगली मैत्रीण आहे. तर वडील मला पंजाबची वाघीण म्हणतात. मोठा भाऊ हा माझा पाठीराखा असल्याने प्रत्येक बाब मी त्याच्याशी बोलते आणि सल्ला घेते. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहचले आहे.
तु मॉडेलिंगला सुरुवात कुठे केली?
17 व्या वर्षी मी माझ्या मॉडेलिंगला सुरुवात केली. सुरुवातीला चंदीगड, पंजाब आणि नंतर देशाचे प्रतिनिधित्व केले. एक म्हण आहे ना जे होते ते चांगल्यासाठीच होते. नंतर मी मागे कधीच वळून पाहिले नाही. जसजशी प्रगती करत गेले, तसतसे मी माझ्या चुकांवर काम केले.
माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यापासून काय प्रेरणा घेतल्या?
त्या दोन्ही सुंदर असून, त्यांची वृत्ती अत्यंत नम्र होती. त्यांनी स्वतःला प्रोफेशनली खूप चांगल्या पध्दतीने हातळले. हे आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. मलाही तसेच व्हायचे आहे. त्यांनी कालच मिस युनिव्हर्स जिंकल्यासारखे वाटते.
मिस युनिव्हर्स अनेक मॉडेल्स चित्रपटात जातात, तुलाही ऑफर आल्या आहेत का?
मी अभिनेत्री असून गेल्या पाच वर्षांच्या काळापासून या क्षेत्रात काम करत आहे. तसेच, दोन पंजाबी चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे आता खूप घाईत मी निर्णय घेणार नाही. माझ्या कुटुंबाला आणि टीम सोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेईल.
तु जागतिक मंचावर मांजरीचा आवाज काढला... तो तुमचा आवडता प्राणी आहे का.. आणि त्याचे कारण काय?
मला सगळे प्राणी खूप आवडतात. मी घोडेस्वारी देखील करते, पाळीव कुत्र्यांना अन्न औषध देते. समाजातील लोक त्यासाठी मदत करतात. प्राणी आपल्यावर प्रेम करतात, आपणांस त्यांच्याकडून शिकलं पाहिजे.
जगभरातील मुलींना तु स्वतःवर विश्वास ठेवा, असा सल्ला दिला... त्याबद्दल काय सांगाल?
जगभरातील सर्वांना माझा हा सल्ला आहे. जेव्हा तुमचा उत्साह जास्त असतो, तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. जर तुमचा विचार आणि हेतू खरा असेल तर तुमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. मी पंजाबी वाघीनीसारखी वावरली असून नेहमी चौकटीबाहेरचा विचार केला आहे. संयम आणि मेहतीने काम करा. यश तुमचेच आहे. अपयशाने खचून जाऊ नका, त्यातून काही शिका, असा सल्लाही तरुणांना दिला.
तुझा भविष्यातील प्लॅंन काय आहे?
मी माझ्या आयुष्यात कोणतेही प्लॅंन केले नाही. मला माझ्या भविष्याचा विचार करायचा आहे. त्यामुळे वर्तमानात राहून मला ते बदलायचे आहे. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. मी एक आनंदी पंजाबी युवती आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडेल, त्यामागे काहीतरी कारण असेल.
हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : 'या' क्रांतिकारकाच्या पिस्तूलचे नाव होते 'बमतुल बुखारा', वाचा सविस्तर...