ETV Bharat / bharat

Entire unit of JDU Dadra Nagar Haveli merged with BJP दादरा, नगर हवेली, दमण दीवमधून जेडीयुचा सफाया, सगळेच नेते भाजपात दाखल - जेडीयू नेते भाजपमध्ये सामील

भाजपने जेडीयूला दणका दिला आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमधील जेडीयू नेते भाजपमध्ये दाखल झाले ( unit of JDU Dadra Nagar Haveli merged with BJP ) आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. वाचा संपूर्ण बातमी...

Entire unit of JDU Dadra Nagar Haveli merged with BJP

author img

By

Published : Sep 19, 2022, 12:10 PM IST

Updated : Sep 19, 2022, 12:21 PM IST

पाटणा : मणिपूरनंतर भाजपने जेडीयूला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमधील 12 हून अधिक JD(U) नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) औपचारिकपणे प्रवेश ( Entire unit of JDU Dadra Nagar Haveli merged with BJP ) केला. जनता दल युनायटेड (JDU) नेते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले सदस्य भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले.

16 JDU नेते भाजपमध्ये सामील झाले : नितीश कुमार यांच्या पक्ष JDU चे हे तिसरे युनिट आहे, ज्याचे नेते JD(U) ने भाजपपासून वेगळे झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातील जेडीयू नेते भाजपमध्ये सामील झाले ( JDU Leader Join BJP ) होते. भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ यांनी सांगितले की, केंद्रशासित प्रदेशातील 16 JD(U) नेते रविवारी पक्षात सामील झाले. यापूर्वी मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमधील काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात संयुक्त आघाडी स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत.

मणिपूरचे पाच आमदार भाजपमध्ये सामील : मणिपूरमध्ये भाजपने जेडीयूला मोठा धक्का दिला आहे. पक्षाच्या 6 पैकी पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मणिपूरमध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या जेडी(यू) आमदारांमध्ये केएच जॉयकिशन, एन सनाते, मोहम्मद अछाबुद्दीन, माजी पोलीस महासंचालक एएम खौटे आणि थंगजाम अरुण कुमार यांचा समावेश आहे.

अरुणाचल प्रदेशात पहिला झटका : अरुणाचल प्रदेशमध्ये २०२० च्या सुरुवातीला भाजपने ७ पैकी ६ आमदारांचा आपल्या पक्षात समावेश केला होता. नंतर जेडीयूचे एकमेव आमदारही पक्ष बदलून भाजपमध्ये दाखल झाले. अशा स्थितीत काही दिवसांतच नितीश कुमार यांना तीनवेळा राजकीय झटका बसला असून, त्यामुळे जेडीयूमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे.

Last Updated : Sep 19, 2022, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.