ETV Bharat / bharat

काश्मिरातील शोपियानमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

शोपियानमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार
शोपियानमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार
author img

By

Published : Feb 19, 2021, 9:27 AM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शोपियानमधील बादिगाम भागात ही चकमक झाली. काश्मीर विभागीय पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला.

दारुगोळा शस्त्रात्रे जप्त -

तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तौयबा या दहशतवादी संघटने सदस्य असल्याची माहिती काश्मिरचे पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडे दारुगोळा, शस्त्रात्रे होती. ती जप्त करण्यात आली असून पोलिसांनी शोध मोहिम सुरूच ठेवली आहे.

बडगाममध्ये अधिकारी शहीद -

दरम्यान, बडगाम जिल्ह्यात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एक विशेष पोलीस पथकातील अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. सेंट्रल काश्मीरमधील बिरवाह झिंनगाम परिसरात ही चकमक झाली. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ दलाने संयुक्तरित्या मोहिम राबवली. शहीद झालेल्या विशेष पोलीस पथकातील अधिकाऱ्याचे नाव अल्ताफ अहमद असून ते चंदोरा येथील रहिवासी होते. तर दुसरा एक पोलीस जवान चकमकीत जखमी झाला आहे. मंझूर अहमद असे या जवानाचे नाव असून तो सोपोर येथील रहिवासी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.