श्रीनगर Encounter In Rajouri : भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत सैन्य दलातील जवानांची जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात चकमक सुरू झाली. या चकमकीत एका जवानाला वीरमरण आलं आहे. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय सैन्य दलाला यश आलं आहे. या भागात चकमक अद्यापही सुरू आहे.
-
#WATCH | Rajouri, J&K: Security heightened as an encounter is underway between security forces and terrorists in Narllah area of district Rajouri in Jammu.
— ANI (@ANI) September 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
One terrorist neutralised; One Army jawan lost his life, and three others including one police SPO were injured in the… https://t.co/uaca8aeucQ pic.twitter.com/D3KIVouIJE
">#WATCH | Rajouri, J&K: Security heightened as an encounter is underway between security forces and terrorists in Narllah area of district Rajouri in Jammu.
— ANI (@ANI) September 13, 2023
One terrorist neutralised; One Army jawan lost his life, and three others including one police SPO were injured in the… https://t.co/uaca8aeucQ pic.twitter.com/D3KIVouIJE#WATCH | Rajouri, J&K: Security heightened as an encounter is underway between security forces and terrorists in Narllah area of district Rajouri in Jammu.
— ANI (@ANI) September 13, 2023
One terrorist neutralised; One Army jawan lost his life, and three others including one police SPO were injured in the… https://t.co/uaca8aeucQ pic.twitter.com/D3KIVouIJE
एका दहशतवाद्याचा खात्मा : राजौरी जिल्ह्यातील नारला गावात मंगळवारी भारतीय सैन्य दलासोबत दहशतवाद्यांची चकमक सुरू झाली. ही चकमक अजूनही सुरूच आहे. या चकमकीत एका जवानाला भारत मातेची सेवा करताना आपलं सर्वोच्च बलिदान द्यावं लागलं आहे. तर दुसरीकडं भारतीय सैन्य दलानं घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात एका एसपीओचा जखमींमध्ये समावेश असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं आहे. जखमी जवानांवर भारतीय सैन्य दलातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जवानांनी सुरू केली होती छापेमारी : जम्मू काश्मीरमधील राजौरीतील नारला गावात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यावरुन भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी नारला गावात शोधमोहीम सुरू केली होती. यादरम्यान भारतीय सैन्य दलांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामुळे भारतीय सैन्य दलांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या एका जवानाला वीरमरण आलं. मात्र भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
भारतीय सैन्य दलाच्या स्निफर डॉगलाही आलं वीरमरण : भारतीय सैन्य दलातील जवानांनी एका दहशतवाद्याला यमसदनी धाडलं आहे. या कारवाईत भारतीय सैन्य दलाचा एक जवानही हुतात्मा झाला आहे. या कारवाईत दहशतवाद्यांना शोधून काढण्यात मोलाची कामगिरी करणारा भारतीय सैन्य दलातील स्निफर डॉगही हुतात्मा झाला आहे.
हेही वाचा :