ETV Bharat / bharat

Sukma Encounter : सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या चकमकीत 3 जवान शहीद - नक्षलवाद्यांचा जवानांवर गोळीबार

सुकमाच्या जगरगुंडा येथे नक्षलवाद्यांनी जवानांवर केलेल्या गोळीबारात 3 जवान शहीद झाले आहेत. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.

naxal attack
नक्षलवादी हल्ला
author img

By

Published : Feb 25, 2023, 1:28 PM IST

सुकमा (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सहायक उपनिरीक्षकासह तीन जिल्हा राखीव रक्षक (DRG) सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी माहिती दिली आहे.

9 वाजता घडली घटना : बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक (IG) पी सुंदरराज यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगरगुंडा आणि कुंदेड गावा दरम्यान ही घटना घडली. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, मृत डीआरजी सुरक्षा कर्मचार्‍यांची नावे एएसआय रामुराम नाग, सहाय्यक कॉन्स्टेबल कुंजम जोगा आणि सैनिक वंजाम भीमा अशी आहेत.

नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान : आयजी म्हणाले, आज सकाळी डीआरजीचे एक पथक कोम्बिंग ऑपरेशनसाठी बाहेर पडले होते. जेव्हा ते जगरगुंडा आणि कुंदेड येथे पोहोचले तेव्हा नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. हल्याच्या वेळी किती नक्षलवाद्यांची उपस्थिती आहे याची पोलिसांना अचूक माहिती होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी ऑपरेशन सुरू केले. पोलिस सूत्रानुसार, चकमकीत नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

नक्षलवादी हल्यांत सातत्याने वाढ : यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी विजापूरमधील भाजपच्या अवपल्ली मंडळाचे अध्यक्ष नीलकंठ काकेम यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. 10 फेब्रुवारी रोजी नारायणपूर जिल्ह्यातील भाजपचे उपाध्यक्ष सागर साहू यांची नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली, तर 11 फेब्रुवारी रोजी दंतेवाडा जिल्ह्यात रामधर आलमी (43) या माजी सरपंचाची हत्या करण्यात आली.

नक्षलवाद्यांच्या हल्यात दोन जवान शहीद : 21 फेब्रुवारीला छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्यात दोन जवान शहीद झाले. गोंदिया-महाराष्ट्र सीमेवरील चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या दोन जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात छत्तीसगड पोलिसातील सार्जंट राजेश सिंह राजपूत आणि छत्तीसगड सशस्त्र दलातील कॉन्स्टेबल ललित सम्राट हे दोन जवान शहीद झाले. हल्यामध्ये नक्षलवाद्यांनी जवानांच्या दुचाकीही जाळून खाक केल्या.

एनआयए चौकशीची मागणी : बस्तर भागातील लोकप्रतिनिधींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, छत्तीसगडचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अशोक जुनेजा यांनी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) पत्र लिहून हत्येची चौकशी करण्याची विनंती केली आहे. अलीकडील घटनांदरम्यान, बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी यांनी अलीकडेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत राजकीय रॅली, सभा आणि संवेदनशील भागात हालचाली करताना लक्षात ठेवल्या जाणार्‍या प्रोटोकॉलबद्दल माहिती दिली. यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या हत्येबद्दल सरकारवर टीका करताना छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमण सिंह यांनी या घटनांना कटाचा एक भाग म्हणून संबोधले होते.

हेही वाचा : Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, महाराष्ट्र सीमेवर दोन जवान शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.