ETV Bharat / bharat

Spicejet Emergency Landing : दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, केबिनमध्ये पसरला होता धूर - केबिनमध्ये पसरला होता धूर

आज सकाळी दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या फ्लाईटदरम्यान केबिनमध्ये धूर पसरला. यानंतर विमान दिल्ली विमानतळावर सुखरूप परत आणण्यात ( emergency landing of spiceJet aircraft ) आले. यासोबतच प्रवाशांनाही सुखरूप उतरवण्यात आले आहे.

Spicejet Emergency Landing
स्पाईसजेटच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
author img

By

Published : Jul 2, 2022, 10:29 AM IST

Updated : Jul 2, 2022, 1:29 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या केबिनमध्ये आज सकाळी धूर पसरला. यानंतर विमान दिल्ली विमानतळावर सुखरूप परत आणण्यात ( emergency landing of spiceJet aircraft ) आले. यासोबतच प्रवाशांनाही सुखरूप उतरवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये धूर स्पष्टपणे दिसत आहे.

विमानात येऊ लागला धूर : स्पाइसजेटचे विमान आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जबलपूरसाठी निघाले. विमान 5000 फूट उंचीवर पोहोचल्यावर अचानक फ्लाइटच्या आतून धूर येऊ लागला. क्रू मेंबरला याची माहिती मिळाल्यावर वैमानिकाने विमान तातडीने दिल्ली विमानतळावर आणण्याचा निर्णय घेतला. ही माहिती IGI विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रकाला देण्यात आली आणि विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची सर्व व्यवस्था करण्यात आली.

स्पाइसजेटच्या विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग

तांत्रिक दोष आला समोर : विमान IGI विमानतळाच्या धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरले. सर्व प्रवाशांना वेळेत विमानातून बाहेर काढण्यात आले. मात्र यादरम्यान धुरामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. काही काळ घबराटीचे वातावरण होते. स्पाइसजेटच्या प्रवक्त्यानेही या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, स्पाइसजेटच्या Q-400 मालिकेतील फ्लाइट क्रमांक SG-2962 मध्ये असा तांत्रिक दोष समोर आला आहे. हे विमान प्रवाशांसह जबलपूरहून सकाळी दिल्लीला रवाना झाले होते. पुढील तपास करण्यात येत आहे. त्यावेळी विमानात किती प्रवासी होते याची पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा : विमानतळावरून उड्डाण करताच स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला लागली आग.. बिहारच्या पाटण्यातील घटना

Last Updated : Jul 2, 2022, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.