ETV Bharat / bharat

तामिळनाडूत 50 फूट खोल विहरीमध्ये पडली हत्तीन; बचावकार्य सुरू - Elephant falls well in Dharmapuri

तामिळनाडुच्या पालाकोडमध्ये तब्बल 50 फूट खोल विहरीमध्ये एक हत्तीन पडल्याची घटना घडली. विहीरीमध्ये पाणी नसून हत्तीनीला काढण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहेत.

तामिळनाडू
तामिळनाडू
author img

By

Published : Nov 19, 2020, 11:52 AM IST

Updated : Nov 19, 2020, 12:14 PM IST

चैन्नई - तामिळनाडुच्या धर्मपूरी जिल्ह्यातील पालाकोडमध्ये तब्बल 50 फूट खोल विहरीमध्ये एक हत्तीन पडल्याची घटना घडली. स्थानिकांनी वनविभागाला याबाबत कळवले असून हत्तीचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ही हत्तीन 12 वर्षांची असल्याचा अंदाज वनविभागने वर्तवला आहे. अन्नाच्या शोधात रात्री हत्तीन पंचपल्ली राखीव जंगलाच्या बाहेर आली असेल, असेही वनविभागने म्हटले आहे.

धर्मपुरी जिल्ह्यातील पालाकोड जवळील पंचपल्ली इलाकुंडूर गावात राहणारे व्यंकटाचलम यांना आज पहाटे हत्तीनीच्या गर्जनेचा आवाज ऐकायला आला. तेव्हा आवाजाच्या दिशेने गेले असता, त्यांना 50 फूट खोल विहरीमध्ये हत्तीन पडल्याचे दिसले. याबाबत त्यांनी ताबडतोब पालाकोड वनविभागाला कळवले. तसेच विहरीमध्ये पाणी नसून हत्तीनीला काढण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहेत. विहरीत पडलेल्या हत्तीनीला पाहण्यासाठी गर्दी झाली.

विजेचा धक्का बसल्याने हत्तीनीचा मृत्यू -

तामिळनाडूच्या सिरुमुगईमध्ये हत्ती शेतात घुसून पीकाचं नुकसान करतात म्हणून लावण्यात आलेल्या विजेच्या तारांमुळे हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याआधीही अशा प्रकारच्या घटना तामिळनाडू, केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये घडल्या आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून शेताभोवती तारेचं कुंपण आणि त्याला विजेचं कनेक्शन जोडल्याचं आढळून आलं. हत्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

  • Tamil Nadu: An elephant was electrocuted to death on a farm near Pethikuttai Reserve Forest, earlier today. During the probe, it was found that owner of the land had allegedly electrified the fence to prevent wild boars from entering the farm. pic.twitter.com/Mu1FARVf3L

    — ANI (@ANI) November 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये एक आहे 'मृत्यूची दरी'

Last Updated : Nov 19, 2020, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.