भोपाळ - शॉक लागल्यानं एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील बिजावर येथील महुआझाला कॉलनीत रविवारी सकाळी घडली.
पाण्याचा टँक खोलण्यासाठी घरातील एक सदस्य टँकमध्ये उतरला होता. टँकमध्ये अंधार असल्यानं लाईटची व्यवस्था केली गेली होती. याचाच करंट या व्यक्तीला लागला. त्याचा आवाज ऐकून घरातील दुसरा एक सदस्यदेखील टँकमध्ये उतरला. त्यानंतर एक-एक करून पाच लोक टँकमध्ये उतरले. यात सहा जणांचा मृत्यू झाला. तर यात जण एक जण गंभीर जखमी झाला आहे.
लक्ष्मण अहिरवार (55 वर्ष) , शंकर अहिरवार (35) मिलन अहिरवार (25), नरेंद्र (20 वर्ष), रामप्रसाद अहिरवार (30), विजय (20) यांचा मृत्यू झाला. या या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसेच गावावर शोककळा पसरली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये वीजा कोसळून तब्बल 41 जणांचा मृत्यू -
राज्यात जोरदार पाऊस झाला. यादरम्यान विविध ठिकाणी वीज कोसळून तब्बल 41 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यात कानपूरमधील 18, प्रयागराज - 13, प्रतापगड - 1, आगरा - 3 आणि वाराणसी व रायबरेलीतीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तसेच 30 पेक्षाजास्त जण जखमी आहेत. वीज कोसळल्याने सर्वात जास्त नुकसान कानपूरमध्ये झाले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रकूट, उन्नाव, प्रयागराज, फिरोजाबाद, कौशाम्बी, कानपुर नगर, कानपुरमध्ये आकाशातील वीज कोसळून मृत्यू झालेल्यांच्या प्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना नियमावलीनुसार तत्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच जखमी झालेल्यांवर योग्य ते उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले.