ETV Bharat / bharat

NCP National Party Withdrawn : निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादी आता राष्ट्रीय पक्ष नाही! - राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा रद्द केला आहे.

NCP National Party
राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष
author img

By

Published : Apr 10, 2023, 10:43 PM IST

Updated : Apr 10, 2023, 10:51 PM IST

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. या सोबतच आयोगाने आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.

राष्ट्रवादी या राज्यात राज्य पक्ष : आयोगाने म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस यांना अनुक्रमे नागालँड आणि मेघालयमध्ये राज्य पक्ष म्हणून ओळखले जाईल. आयोगाने नागालँडमधील लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), मेघालयमध्ये व्हॉईस ऑफ द पीपल पार्टी आणि त्रिपुरामधील टिपरा मोथा यांना 'मान्यताप्राप्त राज्य राजकीय पक्ष'चा दर्जा दिला आहे.

'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा : निवडणूक आयोगाने जुलै 2019 मध्ये या तिन्ही पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावत लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या कामगिरीनंतर त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का रद्द केला जाऊ नये, हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. आयोगाने म्हटले आहे की, दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. आम आदमी पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आहे. मार्चमध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांना 6.77 टक्के मते मिळाली होती. तसेच गेल्या वर्षी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही आपने 5 जागा जिंकल्या होत्या.

आता केवळ 6 राष्ट्रीय पक्ष : आता देशभरात भाजप, काँग्रेस, सीपीआय (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी (बीएसपी), नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि आप हे राष्ट्रीय पक्ष उरले आहेत. या सोबतच सोमवारी जारी केलेल्या आदेशात आयोगाने उत्तर प्रदेशमधील आरएलडी, आंध्र प्रदेशातील बीआरएस, मणिपूरमधील पीडीए, पुद्दुचेरीमधील पीएमके, पश्चिम बंगालमधील आरएसपी आणि मिझोराममधील एमपीसी यांचा राज्य पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी निकष : निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 च्या पॅरा 6B अंतर्गत, जेव्हा पक्ष चार किंवा अधिक राज्यांमध्ये मान्यताप्राप्त राज्य पक्ष असतो तेव्हा त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. गेल्या लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये मिळालेल्या वैध मतांपैकी किमान 6 टक्के मत पक्षाच्या उमेदवारांना मिळाले असेल आणि शेवटच्या निवडणुकीत किमान चार खासदार निवडून आले असतील, याशिवाय, जर एखाद्या पक्षाने किमान तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2 टक्के जागा जिंकल्या तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

हेही वाचा : Shiv Sena Party Funds : 'आम्हाला शिवसेनेची मालमत्ता नको, मालमत्ता विषयक याचिकेशी आमचा संबंध नाही'

Last Updated : Apr 10, 2023, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.