जयपूर - एकीकडे कोरोनाबाधितांना रुग्णालयात बेड मिळत नसताना ह्रदयाला स्पर्शून जाणारी घटना समोर आली आहे. वयोवृद्ध महिला रुग्णाने रुग्णालयात दाखल असताना स्वत:चा बेड ४० वर्षीय व्यक्तीला दिला. ही घटना राजस्थानमधील पाली जिल्ह्यात घडली आहे.
लेहर कंवर ही महिला भावरी गावामधील रहिवाशी आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पाली जिल्ह्यातील बांगड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. खूप प्रयत्नानंतर त्यांना रुग्णालयात बेड मिळाला. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या ४० वर्षीय मुलासाठी रुग्णालयात बेड शोधत असल्याचे लेहर यांनी पाहिले. ते पाहून लेहर यांनी दया आली. त्या तरुणासाठी बेड रिकामा करण्याचे त्यांनी ठरविले.
हेही वाचा-'लोकांचे प्राण जाऊ शकतात, पण पंतप्रधानांची जीएसटी वसूली थांबत नाही'
तरुणाचे आयुष्य हे अधिक महत्त्वाचे-
माझे आयुष्य मी जगले आहे. त्या तरुणाचे आयुष्य हे अधिक महत्त्वाचे असल्याचे लेहर कँवर यांनी त्या रुग्णाच्या वडिलांना सांगितले. हे पाहून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी कंवर यांचे कौतुक केले आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तरुण बेड उपलब्ध करून दिला आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत रुग्णांना रुग्णालयात बेड मिळविणे कठीण जात आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राजस्थान सरकारने १० मे ते २४ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे.
हेही वाचा-चीनचे 'लॉंगमार्च 5बी' रॉकेट केव्हाही पृथ्वीवर पडण्याची शक्यता; चीनने दिली 'ही' प्रतिक्रिया
नागपूरमध्ये ज्येष्ठ नागरिकाने स्वत:चा बेड तरुण रुग्णाला दिल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले होते. मात्र, त्यानंतर घटनेच्या सत्यतेबाबत वाद निर्माण झाले होते.