ETV Bharat / bharat

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही, शरद पवार यांची स्पष्टोक्ती - एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही

एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये तळ ठोकल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आज राज्यातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी येथे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलावली आहे. मात्र राज्यातील घडामोडी पाहता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही, शरद पवार यांची स्पष्टोक्ती

author img

By

Published : Jun 21, 2022, 2:47 PM IST

नवी दिल्ली - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये तळ ठोकल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आज राज्यातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी येथे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलावली आहे. मात्र राज्यातील घडामोडी पाहता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद नको - एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने राज्यातील राजकारणारव काय परिणाम होतील याबाबत शरद पवार यांना विचारले असता. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद नको आहे. त्यासाठी त्यांची नाराजी नसल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.

राजकीय पेचातून मार्ग निघेल - एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांच्यासह गुजरातमध्ये गेल्याने राज्यात राजकीय पेचप्रसंग तयार झाला आहे. मंत्रीच काही आमदारांच्यासह भाजपच्या संपर्कात आल्याने महाविकास आघआडीची चिंता वाढली आहे. त्याबाबत विचारले असता पवार यांनी सद्या जरी राजकीय पेचप्रसंग वाटत असला तरी त्यातून नक्कीच मार्ग निघेल असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार आहेत. मात्र त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेचे काही आमदार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी त्यांच्याबरोबर एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार नसल्याचे स्पष्ट झाले.

मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही - सध्या तरी मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. त्यांना बदलण्याची गरज नसल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच सध्या तरी सरकारवर संकट नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

सरकार पाडण्याचा प्रयत्न - सरकार पाडण्याचा यापूर्वीही प्रयत्न झाला. तो सगळ्यांना माहीतच आहे. तसेच प्रयत्न यापुढेही सुरू राहणार हेही निश्चित आहे. मात्र सरकारला धक्का लागणार नाही.

उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक - पवार संध्याकाळी मुंबईला येत आहे. त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक होईल. त्यावेळी सविस्तर चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले. शिंदेंची कृती हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर जास्त काही बोलण्याची गरज नाही.

क्रॉसव्होटिंग होतच राहते - राज्यसभा निवडणूक तसेच विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर क्रॉसव्होटिंग झाल्याचे दिसून येते. याबाबत विचारले असता निवडणुकीत असे प्रकार होतच राहतात. त्यात काही नवीन नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.