ETV Bharat / bharat

Eknath Shinde : शिवसेनेच्या ३५ नाराज आमदारांसह एकनाथ शिंदे गुवाहाटीत दाखल - Guwahati Assam

शिवसेनेत बंडखोरी करून आपल्या समर्थक ३५ आमदारांसह नाराज असलेले मंत्री एकनाथ शिंदे हे आसामची राजधानी गुवाहाटी येथे दाखल झाले ( Eknath Shinde arrives in Guwahati ) आहेत. तेथे एका हॉटेलमध्ये या सर्व आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jun 22, 2022, 7:01 AM IST

Updated : Jun 22, 2022, 9:23 AM IST

गुवाहाटी ( आसाम ) : विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेना आणि अपक्ष असे मिळून 35 हून अधिक आमदार सोमवारी रात्री सुरतला पोहोचले होते. बुधवारी रात्री सुरत विमानतळावरून ते सर्व गुवाहाटीकडे रवाना झाले. सकाळी ६ च्या सुमारास हे सर्व आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे पोहोचले ( Eknath Shinde arrives in Guwahati ) आहेत.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र सरकारच्या अडचणी वाढल्या असून, राजकीय उलथापालथीचे केंद्र गुजरातमधील सुरत शहर बनले होते. बंडखोरी करत शिवसेनेचे आमदार सुरतमध्ये आले. महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरातमधील सुरत शहरातील ले मेरिडियन हॉटेलमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकार हादरले, एवढेच नाही तर आपल्या नाराज आमदारांचे मन वळवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर टाकली होती. सलग 2 तास प्रयत्न करूनही आपल्या पक्षाच्या आमदारांचे मन वळवण्यात त्यांना अपयश आले.

आमदार सुरतमधून बाहेर पडताना

नितीन देशमुख यांना डिस्चार्ज, घरच्यांनाही माहिती नाही : 35 आमदारांपैकी एक असलेल्या नितीन देशमुख यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर त्यांच्या पत्नीनेही महाराष्ट्रात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सुरत येथील रुग्णालयात दाखल असलेल्या नितीन देशमुख यांच्या वॉर्डाबाहेर कोणालाही जाऊ दिले जात नव्हते. एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री स्पेशल वॉर्डमध्ये पोहोचले आणि त्याचवेळी नितीन देशमुख यांच्या कुटुंबातील काही जणांनी नितीन देशमुख यांच्याशी गप्पा मारल्या. कुटुंबीयांना काही कळण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने नितीन यांना डिस्चार्ज करून एकनाथ शिंदे यांच्याकडे नेले. त्यानंतर ते हॉटेलवर पोहोचले.

आमदारांसह इतर विमानतळावर पोहोचण्यासाठी तीन लक्झरी बस : इतर लोकांसह सर्व आमदारांना विशेष विमानाने आसाममधील गुवाहाटी येथे नेण्याची योजना आखण्यात आली होती. ज्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेलमधून विमानतळावर आणण्यासाठी तीन लक्झरी बसेस हॉटेलवर पोहोचल्या होत्या. जवळपास 65 जण विमानात होते. येत्या काही दिवसांत भाजप आपल्या महाराष्ट्रातील आमदारांनाही तिथे घेऊन जाणार असल्याचे समजते. सोमवारी रात्री उशिरा सर्व आमदारांचे फोन बंद असल्याने शिवसेनेसह त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य त्यांच्याशी संपर्क साधू शकला नाही. महाराष्ट्र सरकार काय करू शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा : बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही सोडलेली नाही आणि सोडणार नाही : एकनाथ शिंदे

Last Updated : Jun 22, 2022, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.