अयोध्या : येथे अठरा हातबॉम्ब शहराच्या कॅन्टोन्मेंट परिसरातील नाल्याजवळ स्थानिकांना मिळाले आहेत. सर्व हँड ग्रेनेड्सच्या पिन काढून टाकण्यात आल्यामुळे त्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो. एका तरुणाने या प्रकरणाची माहिती स्थानिक लष्करी छावणीला दिली. माहिती मिळताच मिलिटरी इंटेलिजन्सचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी झाडाजवळून 18 हातबॉम्ब जप्त केले.
डोगरा कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील निर्मली कुंड चौकाजवळील नाल्याजवळ सुमारे 18 हातबॉम्ब सापडले आहेत. ज्या ठिकाणी हातबॉम्ब सापडले, त्या ठिकाणापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर लष्कराचे हँड ग्रेनेड सराव मैदान आहे. अशा परिस्थितीत हा वापरलेला हँडग्रेनेड इथपर्यंत कसा पोहोचला, हे कळू शकले नाही. सध्या लष्कराने सर्व हँडग्रेनेड नष्ट केले.
लष्कराने पत्र लिहून पोलिसांना दिली माहिती: या प्रकरणी अयोध्याचे एसएसपी शैलेश पांडे यांनी सांगितले की, डोगरा रेजिमेंटल सेंटरने कॅन्ट पोलिस स्टेशनला पत्राद्वारे माहिती दिली होती. सापडलेले सर्व हँडग्रेनेड नष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय त्यांच्याकडे इतर कोणतीही माहिती नाही.
मिलिटरी इंटेलिजन्स (M.I) च्या सूत्रांनुसार, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कारवाईसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दारूगोळ्याचा वापर केला जातो. प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे हातबॉम्ब विनाशकारी नाहीत. मात्र लष्करी कारवाईसाठी दिले जाणारे हातबॉम्ब अत्यंत घातक असतात.