नवी दिल्ली - पत्रकारांसह विविध व्यक्तींचे फोन हॅक करणाऱ्या पीगसस स्पायवेअर प्रकरणाची एडिटर गिल्ड्स ऑफ इंडियाने (EGI) गांभीर्याने दखल घेतली आहे. एडिटर गिल्ड्स पीगसस स्पायवेअर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पत्रकार, राजकीय नेते, सरकारी अधिकारी हे दबावाखाली असल्याचे एडिटर गिल्डने याचिकेत नमूद केले आहे.
पत्रकारिता आणि राजकारण यांना समान दहशत असल्याचे हेरगिरीच्या कृत्यातून सूचित होत आहे. जर भाषण स्वातंत्र्याचे संरक्षण न करता दंडाशिवाय देखरेख करण्याकरिता परवानगी दिली तर घटनात्मक लोकशाही कशी टिकेल, असा प्रश्नही एडिटर गिल्डने याचिकेतून विचारला आहे. लोकांची हेरगिरी करणे म्हणजे घटनेचे उल्लंघन करत भाषण स्वातंत्र्य व माध्यमांवर हल्ला आहे.
हेही वाचा-भारतात आणखी तीन राफेल दाखल; सलग ८ हजार किमीचा केला प्रवास
स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
पीगसस स्पायवेअर प्रकरणात चौकशी समिती नेमण्याची विनंती एडिटर गिल्डने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या समितीमध्ये विविध पार्श्वभूमी असलेले पत्रकार आणि चळवळीमधील कार्यकर्ते असावेत, अशी अपेक्षा एडिटर गिल्डने केली आहे. त्यामुळे तपास हा स्वतंत्रपणे होईल, असेही संस्थेने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण -
पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. हे स्पायवेअर ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आल्याची शक्यता असलेल्यांची एक यादी सध्या लीक झाली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थेने (international media organization) खुलासा केला आहे, की इजराइलचे साफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून भारताचे दोन केंद्रीय मंत्री, 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षातील तीन नेते व एक न्यायाधीशासह 300 लोकांची हेरगिरी केली आहे. पेगासस स्पाइवेयर निर्माण करणारी कंपनी एनएसओ ( NSO) इजराइलची आहे. कंपनीचा दावा आहे की, केवळ सरकारलाच अधिकृत रूपाने या सॉफ्टवेअरची विक्री केली जाते. याचा उद्देश्य दहशतवाद व गुन्हे रोखणे आहे. प्रश्न असा आहे, की काय भारत सरकारने एनएसओ (NSO) कडून हे सॉफ्टवेयर खरीदी केले होते. दरम्यान गार्जियन वृत्तपत्राचे म्हणणे आहे, की एनएसओ (NSO) ने हे सॉफ्टवेअर अनेक देशांना विकले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 50 हजाराहून अधिक लोकांची हेरगिरी केली जात आहे.
काय आहे पेगासस स्पाइवेयर ?
पेगासस एक पावरफुल स्पाइवेयर सॉफ्टवेयर आहे. जे मोबाइल आणि कॉम्प्युटरमधून गोपनीय व वैयक्तिक माहिती चोरून हॅकर्सला पुरवते. याला स्पाइवेयर म्हटले जाते. हे सॉफ्टवेयर तुमच्या फोनच्या माध्यमातून तुमची हेरगिरी करते. इजरायली कंपनी एनएसओ ग्रुपचा दावा आहे, की हे सॉफ्टवेअर ते देशातील अनेक सरकारांना विकत देते. याच्या माध्यमातून आयओएस किंवा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असणारे फोन हॅक केले जाऊ शकतात. त्यानंतर फोनचा डेटा, ई-मेल, कॅमेरा, कॉल रेकॉर्ड आणि फोटोसह प्रत्येक एक्टिव्हीटीला ट्रेस केले जाते.