ETV Bharat / bharat

MGNREGA scam : IAS अधिकारी पूजा सिंघल यांना पचा दिवसीय ईडी कोठडी

झारखंडच्या IAS पूजा सिंघल प्रकरणात गुरुवारी (दि. 21 मे) ईडी ( ED ) दिवसभर सक्रिय होती. पूजाचे पती अभिषेक यांना सायंकाळी चौकशीनंतर सोडून देण्यात आले. आज दिवसभरात काय घडले ते जाणून घ्या या रिपोर्टमध्ये.

पूजा सिंघल
पूजा सिंघल
author img

By

Published : May 12, 2022, 10:43 PM IST

रांची ( झारखंड ) - आयएएस पूजा सिंघल, तिचा पती अभिषेक आणि सीए सुमन कुमार यांचीही ईडीने गुरुवारी चौकशी केली. गुरुवारीच ईडीच्या पाच सदस्यीय पथकाने सरोगी बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणांवरही छापे टाकले. गुरुवारी सायंकाळपर्यंत चाललेल्या छाप्यांमध्ये ईडीच्या पथकाने बिल्डर आलोक सरावगी यांची चौकशी केली. त्याचे वडील गणेश सरावगी यांचाही जबाब नोंदवायचा होता. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे गणेश सरावगी यांची चौकशी होऊ शकली नाही.

आयएएस पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक झा यांनी पल्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी जमीन खरेदी आणि बांधकामात कोट्यवधी रुपये खर्च केले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डर आलोक सरावगी यांच्यावर टाकलेल्या धाडीमध्ये ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे, बँक खात्याचे तपशील आणि गुंतवणुकीची कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडीच्या अधिकार्‍यांनी न्यायालयाला सांगितले की, आलोक सरावगी, सुमन कुमार, पूजा सिंघल आणि अभिषेक झा यांच्या धाडीदरम्यान सापडलेल्या पुराव्यांनुसार आणि माहितीनुसार त्यांची चौकशी करायची आहे.

समोरासमोर चौकशी - गुरुवारी (दि. 12 मे) दुपारी 1.30 नंतर, ईडीने समोरासमोर बसून तिन्ही आरोपींची चौकशी केली. यापूर्वीच्या तपासात अभिषेक झा यांनी सरावगी बिल्डर्सकडूनच पल्स हॉस्पिटलसाठी बरियाटू येथे जमीन खरेदी केल्याचे समोर आले होते. यापूर्वी ही जमीन रुंगटा कुटुंबाच्या ताब्यात असली तरी संपूर्ण जमीन आदिवासी भुईंहरी जमातीची आहे.

पूजाला ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले - सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पूजा सिंघलला होटवार तुरुंगातून ईडीच्या झोन कार्यालयात आणण्यात आले. ईडीच्या कार्यालयात आणल्यानंतर त्यांनी बीपी, भीती वाटत असल्याची तक्रार केली, त्यानंतर डॉ. आर.के. जयस्वाल यांना ईडी कार्यालयात तपासणीसाठी बोलावण्यात आले. तपासणीनंतर, ईडी कार्यालयातून बाहेर पडलेल्या डॉ. जयस्वाल यांनी मीडियाला सांगितले की, पूजा सिंघलला बीपीची तक्रार होती. पण, कोणतीही अडचण नाही.

चौकशीनंतर अभिषेक घरी परतला - डॉक्टरांनी सांगितले की पूजा सिंघल घाबरली होती. तर पूजा सिंघलचा पती अभिषेक झा सकाळी 10.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचला. त्याला ईडीने अनेक कागदपत्रांसह बोलावले होते. तो दिवसातून एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत बाहेर गेला होता. दुपारी 4.30 वाजता चौकशीला सहकार्य करून तो परतला. तोपर्यंत पूजा सिंघलची चौकशी सुरू होती.

जप्त केलेल्या नोटांमध्ये काही नोटा बनावट - ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत जप्त करण्यात आलेल्या एकूण 19.31 कोटींपैकी सुमारे 4 हजार 700 रुपयांच्या नोटा बनावट आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही रोकड कुठून आली, या प्रकरणांच्या तपासात समोर आलेल्या सर्व तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

हेही वाचा - Man Fall Into Well Keral : केरळमध्ये 65 फूट खोल विहीरीत पडला तरुण; 24 तासांपासून बचावकार्य सूरू, पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.