चेन्नई - तमिळनाडुमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या विरोधात अवमानकारक भाष्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने द्रमुकचे नेते ए.राजा यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने द्रमुक नेते ए.राजा यांना 48 तासांसाठी प्रचार करण्यास बंदी घातली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने द्रमुक नेते ए राजा यांना फटकारलं.
निवडणूक आयोगाने त्यांचे नाव तातडीने स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान जागरूक रहावे. बिनधास्त, अशोभनीय, अपमानास्पद, अश्लील भाष्य करू नये. महिलेच्या सन्मानाला इजा पोहोचवू नये, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
निवडणूक आयोगाची कारवाई -
द्रमुकचे नेते ए. राजा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात निवडणूक आयोगाने ए. राजा यांना नोटीस बजावली होती. परंतु राजा यांनी आयोगाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात ही कारवाई केली.
तमिळनाडू विधानसभा निवडणूक -
तामिळनाडूमध्ये 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी 4 एप्रिल रोजी संध्याकाळी निवडणूक प्रचार संपुष्टात येणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 2 मेला जाहीर होईल.
हेही वाचा - खुर्चीसाठी कायपण! पंचायत निवडणुकांसाठी ४५व्या वर्षी ब्रह्मचर्य तोडत केलं लग्न