नवी दिल्ली Assembly Elections 2023 Dates : देशातील निवडणुकासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. भारतीय निवडणूक आयोगानं पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलंय. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर, राजस्थानात 23 नोव्हेंबर, मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणात 30 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर पाचही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी 3 डिसेंबरला होणार आहे.
5 राज्यांत विधानसभेच्या 679 जागा : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, निवडणूक आयोगाच्या टीमनं पाचही निवडणूक राज्यांचा दौरा केला आणि सर्व राजकीय पक्षांसोबत बैठका घेतल्या. आम्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांच्या सूचना आणि प्रतिक्रिया घेतल्या. या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या 679 जागा असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.
सत्ता टिकविण्याचं राजकीय पक्षांना मोठं आव्हान- मिझोराम विधानसभेची मुदत 17 डिसेंबरला संपत आहे. तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. भारत राष्ट्र समितीची (BRS) तेलंगणात सत्ता आहे. तर मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. या पाचही राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याचं मोठं आव्हान आहे.
मध्य प्रदेशमध्ये कशी आहे निवडणूक स्थिती : मध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा असून विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 6 जानेवारी 2024 रोजी संपणार आहे. त्याआधी राज्यात नवे सरकार स्थापन करण्याकरिता निवडणुका वेळीच घ्याव्या लागणार आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केलं होते. परंतु काँग्रेस सरकारच्या सुमारे 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया हे भारतीय जनता पक्षात सामील झाले. यानंतर काँग्रेस सरकार कोसळलं. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन झाले.
हेही वाचा-