ETV Bharat / bharat

Instant Ticket Booking : दिवाळीत तत्काळ तिकीट बुक करण्याची 'ही' आहे सोपी पद्धत

author img

By

Published : Oct 19, 2022, 11:07 AM IST

कामानिमित्त घरापासून लांब राहणाऱ्या नागरिकांना एकमेव भरवश्याचा प्रवास म्हणजे भारतीय रेल्वे . IRCTCवरून तत्काळ तिकीट बुकिंग ( IRCTC Ticket Booking ) करण्यापूर्वी आता तुम्हाला तुमच्या प्रोफाइलमध्ये काही बदल करावे लागतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स ( IRCTC Ticket Booking tips ) सांगणार आहोत.

Instant Ticket Booking
तत्काळ तिकीट बुक

नवी दिल्ली : कामानिमित्त घरापासून लांब राहणाऱ्या नागरिकांना एकमेव भरवश्याचा प्रवास म्हणजे भारतीय रेल्वे . IRCTCवरून तत्काळ तिकीट बुकिंग ( IRCTC Ticket Booking ) करण्यापूर्वी आता तुम्हाला तुमच्या प्रोफाइलमध्ये काही बदल करावे लागतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स ( IRCTC Ticket Booking tips ) सांगणार आहोत.

तत्काळ ट्रेनचे तिकीट कसे बुक कराल : ट्रेनमधून अचानक प्रवास करणे कधीकधी कठीण होते. कारण कन्फर्म ट्रेन तिकीट मिळत नाही. आणि तुम्हाला अर्जंटमध्ये बाहेर निघावे लागते. प्रवास आणखी सोपा होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्हाला प्रत्येक वेळी रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणार आहे. तुम्ही तत्काळ ट्रेनचे तिकीट बुक करत नसले तरीही. यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याचीही गरज ( How to book train tickets instantly) नाही.

माहिती पुन्हा भरावी लागणार नाही : प्रोफाइलमध्ये काही बदल करावे लागतील. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की जेव्हा तत्काळ तिकीट बुकिंग सुरू होईल, तेव्हा तुम्हाला सर्व काही पुन्हा भरावी लागणार नाही. सहसा, तत्काळ तिकीट बुक करताना, बहुतेक वेळा प्रवाशांचा वेळ तपशील भरण्यात ( No need to fill information again ) जातो.

तिकीट बुक करताना टिप्स : सर्व प्रथम, IRCTC मध्ये लॉग इन केल्यानंतर, My Profile पर्यायावर जा. येथे गेल्यावर तुम्हाला मास्टर लिस्ट बनवावी लागेल. मास्टर लिस्ट तयार करण्यासाठी, तुम्हाला सर्व प्रवाशांचे तपशील प्रविष्ट करावे लागतील. मास्टर लिस्ट बनवल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रवाशाची माहिती टाकावी लागणार नाही. कारण तुम्ही ही तयारी आधीच केली असेल आणि तुमचा बराच वेळही वाचलेला असेल.

सकाळी 10 वाजता बुकिंग सुरू : AC तत्काळ तिकीट बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते. स्लीपर क्लासचे बुकिंग सकाळी 11 वाजता सुरू होते. त्यामुळे तुम्हाला त्यापूर्वी 2 मिनिटे लॉग इन करून बसावे लागेल. तुमच्याकडे आधीपासून मास्टर लिस्ट असल्याने, तुम्हाला कोणताही प्रवासी तपशील टाकण्याची गरज नाही. तत्काळ तिकीट उघडताच, मास्टर लिस्ट निवडताच सर्व प्रवाशांचे तपशील आपोआप भरले जातील. पण ही प्रक्रिया पूर्ण करताना वेळेलाही खूप महत्त्व असते. सर्व गोष्टी केल्यानंतर, तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तुमच्याकडे पेमेंटचे अनेक पर्याय असतील. यामध्ये तुम्ही डेबिट/क्रेडिट कार्डनेही पेमेंट करू शकता. यासह, नेट बँकिंग देखील तुमच्यासाठी पेमेंट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.