जम्मू : जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ परिसरातील डोडा जिल्ह्यात रविवारी भूकंपाचे तीन धक्के जाणवले. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नुकसान झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. डोडा येथे पहाटे 3.50 वाजता 32.96 अंश उत्तर अक्षांश आणि 75.79 अंश पूर्व रेखांशावर पहिला भूकंप झाला, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भूकंपाचे धक्के : भूकंपाच्या हालचालींवर नजर ठेवणाऱ्या नोडल सरकारी एजन्सीने सांगितले की, सकाळी ५.२२ वाजता दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याचा केंद्रबिंदू 33.01 अंश उत्तर अक्षांश आणि 75.78 अंश पूर्व रेखांशावर 10 किमी खोलीवर होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पहिल्यांदा भूकंप झाला तेव्हा लोक झोपेतून जागे झाले आणि घराबाहेर पळू लागले. यानंतर लडाखमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा तिसरा हादरा जाणवला. जे अक्षांश 35.72 आणि रेखांश 79.98, जमिनीच्या खाली 10 किमी होते.
भूकंपाची तीव्रता : डोडामध्ये गेल्या सहा दिवसांत 10 वेळा वेगवेगळ्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जिल्ह्याला 13 जून रोजी 5.4 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, ज्यामुळे घरांसह डझनभर इमारतींना तडे गेले. एनसीएसने शनिवारी रात्री 10.38 वाजता लडाखमध्ये 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप आणि रात्री 9.44 वाजता लेहमध्ये 4.5 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद केली. त्यांनी सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू लेहपासून 215 किमी ईशान्येला 10 किमी खोलीवर होता.
भूकंपामुळे झाले नुकसान : दोडा येथील भदेरवाह शहरात भूकंपामुळे उपजिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डचे फॉल्स सिलिंग कोसळले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही मलबा रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांवर पडला, त्यानंतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. भदेरवाहचे रहिवासी अझीम मलिक यांनी सांगितले की, भूकंपामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा :
- Earthquake in Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम कामेंग भागात ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप
- Earthquake Near Koyna Dam : कोयना धरणाजवळ ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; धरणापासून ५ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू
- Earthquake In Bihar: बिहारच्या काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के, 4.3 रिश्टर स्केलची नोंद