नवी दिल्ली : जयपूरमध्ये भूकंपाच्या हादऱ्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जयपूरमध्ये अर्ध्या तासात भूकंपाचे तीन धक्के बसल्याने प्रशासनाचीही मोठी डोकेदुखी वाढली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या अहवालात शुक्रवारी सकाळी 04.25 वाजता भूकंपाचे धक्के बसल्याचे नमूद केले आहे. दुसरीकडे मणिपूरमध्येही भूकंप झाल्याची नोंद आहे.
-
An earthquake of magnitude 3.5 on Richter scale hits Manipur's Ukhrul: National Center for Seismology pic.twitter.com/7yFvtNba0i
— ANI (@ANI) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An earthquake of magnitude 3.5 on Richter scale hits Manipur's Ukhrul: National Center for Seismology pic.twitter.com/7yFvtNba0i
— ANI (@ANI) July 21, 2023An earthquake of magnitude 3.5 on Richter scale hits Manipur's Ukhrul: National Center for Seismology pic.twitter.com/7yFvtNba0i
— ANI (@ANI) July 21, 2023
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार जयपूरमध्ये भूकंपाचा पहिला धक्का 03.4 तीव्रतेचा झाला आहे. हा भूकंप पहाटे 4.09 च्या सुमारास झाल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरा धक्का 03.1 तीव्रतेचा भूकंप सकाळी 04.22 वाजता झाला. तर भूकंपाचा तिसरा धक्का 04.25 वाजता झाला असून तो 3.4 तीव्रतेचा असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने स्पष्ट केले आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, शेवटचे वृत्त येईपर्यंत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यावर प्रतिक्रिया देताना राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यासह इतर ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जयपूर आणि लोक सुरक्षित असल्याची आशा व्यक्त केली. जयपूरमधील स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर काही ठिकाणी रस्त्यावर जमलेल्या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
Another earthquake of Magnitude 3.4 strikes Jaipur, Rajasthan: National Center for Seismology
— ANI (@ANI) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
This is the 3rd earthquake that has struck Jaipur in an hour pic.twitter.com/zUoHX4Vwcz
">Another earthquake of Magnitude 3.4 strikes Jaipur, Rajasthan: National Center for Seismology
— ANI (@ANI) July 20, 2023
This is the 3rd earthquake that has struck Jaipur in an hour pic.twitter.com/zUoHX4VwczAnother earthquake of Magnitude 3.4 strikes Jaipur, Rajasthan: National Center for Seismology
— ANI (@ANI) July 20, 2023
This is the 3rd earthquake that has struck Jaipur in an hour pic.twitter.com/zUoHX4Vwcz
मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के- हिंसाचार सुरू असताना मणिपूरला भूकंपाचाही जोरदार धक्का बसला. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांना चांगलाच हादरा बसला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या अहवालानुसार शुक्रवारी सकाळी मणिपूरच्या उखरुलमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद रिश्टल स्केलवर करण्यात आली आहे. हा भूकंप शुक्रवारी पहाटे 05.01 वाजता झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. मणिपूरमधील उखरुल परिसरात 3.5 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद करण्यात आल्याने नागरिकांना चांगलाच हादरा बसला आहे. हा भूकंप उखरुलमध्ये 20 फूट खोलीवर झाल्याची माहितीही नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या सूत्रांनी दिली आहे. हा भूकंप अक्षांक्ष 24.99 आणि 94.21 रेखांक्षावर झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. भूकंपाची तीव्रता जास्त असली, तरी या भूकंपात कोणतीही हानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
हेही वाचा -