अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, यापूर्वी स्पर्धांसाठी खेळाडूंच्या निवडीत पारदर्शकतेचा अभाव होता, त्यामुळे खेळाडूंची प्रतिभा वाया जात होती. गुजरात सरकारने येथे आयोजित केलेल्या 'खेल महाकुंभ' या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या 11व्या आवृत्तीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
आता परिस्थिती बदलली
यापूर्वी स्पर्धांसाठी खेळाडूंच्या निवडीत पारदर्शकतेचा अभाव होता, त्यामुळे आपल्या खेळाडूंची प्रतिभा वाया जात होती, असे ते म्हणाले. त्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागले. पण आता परिस्थिती बदलली असून, खेळाडू यश मिळवत आहेत. सुवर्ण आणि रौप्य पदकांची चमक आपल्या युवकांचा आत्मविश्वास वाढवत आहे, असेही मोदी म्हणाले.
ही फक्त सुरुवात
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदके आणि पॅरालिम्पिकमध्ये 19 पदके जिंकली, ते म्हणाले की, "ही फक्त सुरुवात आहे, भारत मागे हटणार नाही, भारत खचून जाणार नाही." युक्रेनमधून परतलेले तरुण म्हणत आहेत की आता त्यांना उदयोन्मुख भारताचा प्रभाव समजला आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.