कोलार (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कर्नाटकातील कोलार येथे जाहीर सभा झाली. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या 'विषारी साप' या विधानाचा खरपूस समाचार घेत ते म्हणाले की, साप हे भगवान शिवाच्या गळ्यातील आकर्षण आहे. त्यांच्यासाठी देशातील जनता 'देवाचे रूप' आहे. अशा स्थितीत त्यांची तुलना जनतेच्या गळ्यात लपेटलेल्या सापाशी व्हायला हरकत नाही असे म्हणत त्यांनी खरगे यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. 'साप हा भगवान शंकर (शिव) यांच्या गळ्यातील मोहिनी आहे आणि माझ्यासाठी देशातील जनता हे देव-देवाचे रूप आहे. ते शिवाचे रूप आहे, त्यामुळे लोकांच्या गळ्यात सजवलेला साप असायला मला काहीच हरकत नाही असही ते म्हणाले आहेत.
काँग्रेसवर निशाणा : कर्नाटकातील प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी मोदींची तुलना विषारी सापाशी केली होती. त्यानंतर कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. हे विधान पंतप्रधान मोदींसाठी नसून ते ज्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात त्याबद्दल असल्याचे स्पष्टीकरण खरगे यांनी दिले होते. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, सर्वात जुना पक्ष नेहमीच '85 टक्के कमिशन'शी संबंधित आहे आणि त्याचे 'राजघराणे' हजारो कोटींच्या घोटाळ्यांमध्ये गुंतलेले आहे असे म्हणत त्यांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला.
एक रुपया पाठवला तर १५ पैसे जमिनीवर पोहोचतात : कोलारला ही जाहीर सभा झाली. देशाचा काँग्रेस आणि त्यांच्या राजघराण्यावरील विश्वास उडण्याचे एक कारण म्हणजे काँग्रेसची ओळख कायमच ८५ टक्के कमिशनशी जोडली गेली आहे. काँग्रेसच्या राजवटीत त्यांचे प्रमुख नेते आणि तत्कालीन पंतप्रधान अभिमानाने म्हणायचे की, दिल्लीतून एक रुपया पाठवला तर १५ पैसे जमिनीवर पोहोचतात. काँग्रेसच्या तावडीत गरिबांची 85 पैसे हिसकावून घेतली. पंतप्रधान म्हणाले, 'हा भाजपचा आरोप नाही, तर काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांचा आहे असही ते म्हणाले. 85 टक्के कमिशन मिळवणारी काँग्रेस कर्नाटकच्या विकासासाठी कधीही काम करू शकत नाही असा घणाघातही त्यांनी केला आहे.