ETV Bharat / bharat

Gold Seize News : डीआरआयची महाराष्ट्र, बिहारमध्ये मोठी कारवाई; 101.7 किलो सोने जप्त, 10 तस्करांना अटक - Gold Seize

डीआरआयने बिहार, महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन गोल्ड डॉन पॅन इंडिया अंतर्गत आतापर्यंत 10 तस्करांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पाटणा जंक्शन येथून 3 सुदानी तस्करांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तस्करांकडून 101.7 किलो सोन्याची पेस्ट आणि चलन जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने पाटणा, मुंबई आणि पुणे येथे कारवाई केली आहे.

Gold Seize
Gold Seize
author img

By

Published : Feb 21, 2023, 10:17 PM IST

मुंबई : देशाची फसवणूक करून परदेशात सोने पुरवठा करणाऱ्या सुदानी सिंडिकेटचा डीआरआयने पर्दाफाश केला आहे. डीआरआय ( Directorate of Revenue Intelligence ) द्वारे राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन गोल्ड डॉन' या विशेष मोहिमेत सुमारे 51 कोटी रुपयांचे 101.7 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. पकडलेल्या 10 तस्करांपैकी सात तस्कर सुदानी नागरिक आहेत. तर, तीन भारतीयांचा यात समावेश आहे. डीआरआयने बिहारमधील पाटणा, महाराष्ट्रातील दोन शहरांमध्ये ही कारवाई केली.

भारत-नेपाळ सीमेवरून सोन्याची तस्करी : ऑपरेशन गोल्ड डॉन पॅन इंडिया अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत मोठा खुलासा झाला आहे. पाटणा, पुणे, मुंबई येथे ही कारवाई करण्यात आली. सोने तस्कर भारत-नेपाळ सीमेवरून पाटण्याला येत असत. नंतर विमान तसेच रेल्वेच्यामाध्यमातून तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी पाटण्यात ३७ किलो सोन्याच्या पेस्टसह ३ सुदानी नागरिकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे.

मुंबई, पुणे, पाटण्यामध्ये तस्करी : हे तस्कर पाटणा जंक्शनवरून मुंबईला जाणारी ट्रेन पकडणार होते. त्यावेळी डीआरआय त्यांच्यावर नजर ठेऊन कारवाई केली आहे. यापैकी 3 सुदानी नागरिक आहेत. त्यांच्याकडून 40 पॅकेटमध्ये 37 किलो सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली आहे. 74 लाख विदेशी चलन आणि 63 लाख भारतीय चलनही जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंतच्या कारवाईत 101.7 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

101 किलो सोने, चलन जप्त : तस्कर भारत-नेपाळ सीमेवर सोने घेऊन प्रवेश करायचे. हे तस्कर पाटणा जंक्शनवरून निघण्याच्या तयारीत असतांना डीआरआयच्या तावडीत सापडले. याप्रकरणी एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये 7 सुदानी नागरिक आहेत. ज्यामध्ये 3 जणांना पाटण्यात अटक करण्यात आली आहे. उर्वरित विदेशी तस्कर वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडण्यात आले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Supari Allegation : ठाण्यात शिजली संजय राऊतांच्या हत्येची खिचडी! वाचा संपूर्ण प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.