ETV Bharat / bharat

Gas Cylinder Price : होळीपूर्वी सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडर महागले ; जाणून घ्या नवे दर

होळीपूर्वी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा दणका दिला आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. या सोबतच व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही 350 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Gas Cylinder
गॅस सिलिंडर
author img

By

Published : Mar 1, 2023, 7:46 AM IST

Updated : Mar 1, 2023, 9:38 AM IST

नवी दिल्ली : होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती गॅस कंपन्यांनी दीर्घ कालावधीनंतर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर 1 मार्चपासून लागू झाले आहेत. 6 जुलै 2022 नंतर तेल कंपन्यांनी पहिल्यांदाच किंमती बदलल्या आहेत.

  • Domestic LPG Cylinder 14.2 kg prices increased by Rs 50/. Domestic LPG cylinder price increased to Rs 1103/ in Delhi: sources

    — ANI (@ANI) March 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रमुख शहरात घरगुती सिलेंडरची किंमत : आता मुंबईत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1102 रुपये झाली आहे. आतापर्यंत हे सिलेंडर 1052 रुपयांना मिळत होते. दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 1053 रुपयांऐवजी 1103 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1079 रुपयांऐवजी 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांऐवजी 1118.5 रुपये असेल.

व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही वाढ : या सोबतच व्यावसायिक सिलेंडरच्या ग्राहकांना देखील मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ झाली आहे. आत दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1769 रुपयांऐवजी 2119.5 रुपयांना मिळेल. कोलकात्यात तो 1870 रुपये होता, आता तो 2221.5 रुपये झाला आहे. मुंबईत त्याची किंमत 1721 रुपयांवरून आता 2071.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये 1917 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 2268 रुपयांना मिळणार आहे.

  • 19 kg Commercial LPG cylinder prices increased by Rs 350.50 With this increase 19 kg commercial cylinder will cost Rs 2119.50 in Delhi. New rates are effective from today: Sources

गेल्या वर्षी चार वेळा वाढ : 2022 मध्ये, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत चार वेळा वाढ करण्यात आली होती. शेवटची वाढ 6 जुलै 2022 रोजी करण्यात आली होती. पहिली वाढ 22 मार्च 2022 रोजी झाली होती. त्यावेळी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली होती. 7 मे 2022 रोजी पुन्हा 50 रुपयांनी आणि 19 मे 2022 रोजी पुन्हा 3.5 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. अशाप्रकारे सिलंडरची एकूण किंमत 153.5 रुपयांनी वाढली होती. ओएमसी द्वारे दर महिन्याला एलपीजी सिलेंडरची किंमत वाढवण्याची प्रथा आहे.

भाववाढीवर कॉंग्रेसची टीका : गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतींवरून कॉंग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते एनएस बोसेराजू यांनी भाजपच्या हँडलला टॅग करत लिहिले की, 'गेल्या 4 वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एलपीजी सिलिंडरचे दर आता 1200 रुपयांच्या जवळपास आहेत. महागाईमुळे महिला आता एलपीजीपासून पुन्हा सरपणकडे वळत आहेत. ग्रामीण महिलांसाठी आजचा दिवस फार दुःखाचा आहे'.

हेही वाचा : Centre Issues Heatwave Alert : देशात उकाडा वाढला, खबरदारी घेण्याच्या केंद्राच्या सूचना

Last Updated : Mar 1, 2023, 9:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.