लखनऊ Doctors Murder In UP : जमीनीच्या वादातून एका डॉक्टरचा खून ( Murder In UP ) करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. घनश्याम त्रिपाठी असं खून झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. घनश्याम त्रिपाठी हे जयसिंगपूर सामूदायिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. याप्रकरणी घनश्याम त्रिपाठी यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांना लवकरच पकडण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमेन बर्मा यांनी दिली आहे.
नकाशा बनवण्यासाठी रोकड घेऊन गेले होते घराबाहेर : डॉक्टर घनश्याम त्रिपाठी हे घटनेच्या दिवशी नकाशा बनवण्यासाठी तीन हजार रुपयाची रोकड घेऊन घराबाहेर गेले होते. यावेळी ते परत आले तेव्हा मात्र जखमी अवस्थेत असल्याचं घनश्याम त्रिपाठी यांची पत्नी निशा त्रिपाठी यांनी सांगितलं. निशा त्रिपाठी यांनी नारायणपूरमधील काही नागरिकांवर घनश्याम त्रिपाठी यांच्या हत्येप्रकरणी आरोप केला आहे.
उपचारादरम्यान झाला मृत्यू : डॉक्टर घनश्याम त्रिपाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाले होते. यावेळी त्यांना त्यांच्या पत्नी निशा त्रिपाठी यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे याबाब घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, तपासाची चक्रे फिरवली. डॉक्टर घनश्याम त्रिपाठी यांच्या पत्नी निशा त्रिपाठी यांनी नारायनपूर इथल्या काही नागरिकांविरोदात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
शिशू मंदिरामागं घेतली होती जमीन : डॉक्टर घनश्याम त्रिपाठी यांनी कथितरित्या शुशूमंदिराच्या मागं जमीन घेतली होती. त्यामुळे या जमीनीवरुन त्यांचा सतत काही नागरिकांसोबत वाद होत असल्याचं निशा त्रिपाठी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध पथकं तयार केली आहेत. त्यामुळे मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमेन बर्मा यांनी दिली आहे.
हेही वाचा :