ETV Bharat / bharat

Brain Fog Symptoms : ब्रेन फॉगच्या तीव्र लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका - ब्रेन फॉगच्या तीव्र लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

कोरोना काळात ब्रेन फाॅग हा शब्द मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्या ओळखीचा झाला, कारण या विषाणूचा सर्वात जास्त दुष्परिणाम पहायला मिळाला होता. पण ही स्थिती इतर कारणांमुळे पण उद्भवू शकते आणी त्यामुळे अशा रुग्णांच्या जीवनावर परिणाम होउ शकतो. त्यामुळे ब्रेन फाॅगच्या तीव्र लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका असा सल्ला तज्ञ देतात (Do not ignore acute symptoms of brain fog)

brain fog
ब्रेन फॉग
author img

By

Published : Jan 14, 2023, 7:05 PM IST

हैदराबाद: कोविड काळात मेंदूशी संबंधित आजाराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. विस्मरण किंवा कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू न शकण्याच्या समस्येला लोक निष्काळजी वृत्तीचे लक्षण म्हणून नाकारतात किंवा चुकीच्या पध्दतीने याच गोष्टीला स्मृतीभ्रंश म्हणून संबोधतात. काही वेळा शारीरिक किंवा मानसिक परस्थितीमुळे, शाररिक रोगांमुळे कमकुवतणामुळे किंवा परस्थितीमुळे लोक तात्पुरत्या स्वरुपात काही गोष्टी विसरतात. एकाग्रतेचा अभाव आणि इतर संबंधित लक्षणे असतील तर त्याला ब्रेन फाॅगिंग (brain fog) मानले जाते.

कोविड संसर्गाच्या गंभीर प्रकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये साइड इफेक्ट म्हणून मेंदूच्या फाॅगिंगचे निदान केले जाते. परंतु ब्रेन फाॅगच्या विकासाच्या अनेक कारणांपेैकी कोविड हे एक कारण आहे. तांत्रीकदृष्टया ब्रेन फाॅग हा वेद्यकीय आजार नसून ती एक अशी स्थिती आहे ज्यात वेगवेगळ्या कारणांमुळे मेंदूची विचार करण्याची तसेच कार्य करण्याची क्षमता कमी होते. शिवाय स्मरणशक्ती, एकाग्रता, स्पष्ट विचार करण्यात येणारी अडचण तसेच कामे पुर्ण करण्यात येणाऱ्या समस्या हे पण ब्रेन फाॅग मधे दिसुन येतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोविडच्या बाबतीत, मेंदूत बदल हा दुष्परिणाम म्हणून अधिक दिसला कारण विषाणूमुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम झाला, ज्यामुळे मेंदूमध्ये न्यूरोलॉजिकल बदल झाले. अनेक संशोधकांनी न्यूरोट्रांसमीटर कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याची प्रकरणे देखील नोंदवली आहेत. दिल्लीतील मानसोपचार तज्ज्ञ डॉ आशिष सिंह म्हणतात की, कोविड 19 दरम्यान लोकांना 'ब्रेन फॉग' स्थितीबद्दल अधिक माहिती मिळाली असली तरी ही एक सामान्य समस्या आहे, ज्यासाठी इतर अनेक कारणे देखील जबाबदार असू शकतात. सध्याच्या काळातही, असंतुलित जीवनशैली जगणाऱ्या लोकांमध्ये याचे निदान होते.

त्यांनी असेही स्पष्ट केले आहेकी, ब्रेन फाॅगिंगसाठी अनेक घटटक कारणीभूत असू शकतात, जसे की कार्यालयीन कामाचा ताण, घरचा ताण, अनेक प्रकारची कामे, अभ्यास भविष्याची काळजी अशा अनेक घटकांचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. वेद्यकिय उपचारामुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. वैद्यकीय भाषेत ब्रेन फाॅग ही अशी स्थिती आहे जी लोकांच्या विचार करण्याच्या, लक्षात ठेवण्याच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते.

जरीही गंभीर रोग नसला तरी, बऱ्याच लोकांना असे वाटते की ही स्थिती एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करु शकते, पण तसे नाही. ही स्थिती एखाद्या व्यक्तीच्या सामान्य दैनंदिन दिनचर्येवर परिणाम करते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या काम करण्याच्या किंवा लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होते, तेव्हा त्यांच्या मध्ये नैराश्य, चिंता किंवा कधी कधी कमी आत्मसन्मान या सारख्या भावना निर्माण होउ शकतात.

ब्रेन फॉगिंग हे सामान्यतः डिमेंशिया किंवा अल्झायमरसारख्या रोगांच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक मानले जाते, ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या स्मरणशक्तीवर नियंत्रण गमावते. या व्यतिरिक्त, चिंता विकार, नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांचे पण लक्षण मानले जाते. मेंदूतील अशा बदल्याची स्थिती कधीकधी इतर शारीरिक आजार, मेंदूज्वर, अर्धांगवायू, मधुमेह, एन्सेफलायटीस, मायग्रेन शरीरातील ऑक्सिजनची कमतरता आदी समस्यांमुळे होउ शकते. काही गंभीर आजारांच्या उपचारा दरम्यान दिलेल्या थेरपीचे किंवा औषधांचे परिणाम असू शकतात.

ब्रेन फाॅगींगच्या इतर कारणांत नैराश्य किंवा अत्यंत तणाव, मल्टी टास्किंग, हार्मोनल असंतुलन, पुरेशी आणि चांगल्या दर्जाची झोप न मिळणे, शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि इतर पोषक तत्वांची कमतरता, रक्तक्षय, मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्हीवर जास्त वेळ घालवणे.यांचाही समावेश असु शकतो. अनेक वेळा ही समस्या महिलांमधे गर्भधारणेच्या दरम्यान किंवा रजोनिवृत्तीच्या काळातही पहायला मिळते कारण त्यावेळी त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात.

डॉ आशिष यांनी स्पष्ट केले की, या अवस्थेतील रुग्णांमध्ये विस्मरण आणि लक्ष न लागणे याशिवाय इतर अनेक लक्षणे दिसून येतात. वेगवेगळ्या लोकांमध्ये लक्षणे भिन्न असतात. शारीरिक किंवा मानसिक स्थितीनुसार, वेगवेगळ्या तीव्रतेची एक किंवा अधिक लक्षणे लोकांमध्ये दिसू शकतात. यात स्मरणशक्ती कमी होणे, लोकांची किंवा वस्तुंची नावे विसरणे कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण स्पष्ट विचार करण्यास त्रास, जास्त झाेप येणे काहीही न करता थकवा जाणवणे खराब कामगिरी कमीपणा नैराश्याची भावना कामाचा कमी वेग सतत गोंधळाची स्थिती यांचा समावेश असु शकतो.

वयोवृद्ध लोकांमध्ये ही समस्या म्हातारपणामुळे दिसणे सामान्य असले तरी, जर लोकांना ही समस्या तरुण वयात किंवा कोणत्याही आजारानंतर होऊ लागली, तर त्याच्या लक्षणांची तीव्रता वाढते. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डाॅक्टरांनी स्पष्ट केले आहे की, तुम्हाला अशी शक्यता किंवा त्रास जाणवत असेल तर सर्वप्रथम त्याची स्थिती समजून घेणे आणि स्विकारणे आवश्यक आहे.

सोबतच तुमची जीवनशैली आणि आहार सुधारणे तुमच्या वर्तनाला शिस्त लावणे जसेकी तुमच्या दैनंदिन कामाची यादी करणे याचा खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे विस्मरणामुळे कोणतेही काम राहून जाण्याची शक्यता कमी होईल. शिवाय विविध सवयी अंगीकारल्याने ब्रेन फाॅगिंग कमी होउ शकते त्यासाठी पुढिल उपाय फायद्याचे ठरु शकतात जसेकी, विश्रांतीचे नियोजन, पोष्टिक अन्नाचा वापर, नियमित व्यायाम, विशेषत: योग आणि ध्यान एका वेळी एकच काम करणे, शांत आणि आनंदी ठेवणारी कामे करण्यासाठी थोडा वेळ काढणे, कामात इतरांची मदत आणि सल्ला घेण्यास संकोच न करने आणि मित्र व कुटुंबियांसोबत वेळ घालवला तर मोठा फरक पहायला मिळतो.

हेही वाचा : Fever And Cold : 3 ते 5 दिवसात बरे होणारे ताप-सर्दी यांसारखे आजार, 'या' कारणामुळे लवकर बरे होत नाहीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.