ETV Bharat / bharat

DK Shivakumar Meets Sharad Pawar : कर्नाटकात डी के शिवकुमार यांनी शरद पवारांची घेतली भेट; 30 मिनिटे चालली चर्चा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी ( Sharad Pawar Karnataka visit ) सफरचंदाचा मोठा हार आणला. कार्यकर्त्यांनी विमानतळ ते बनासवाडी येथील पक्ष कार्यालयापर्यंत रॅली ( NCP office in Banaswadi ) काढण्यात आली. डीके शिवकुमार यांनी विमानतळाजवळील हॉटेलमध्ये शरद पवार यांच्याशी सुमारे 30 मिनिटे ( D K Shivakumar meet Sharad Pawar ) चर्चा केली.

डी के शिवकुमार शरद पवार भेट
डी के शिवकुमार शरद पवार भेट
author img

By

Published : Apr 18, 2022, 4:19 PM IST

बंगळुरू - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांचे बंगळुरू विमानतळावर आज आगमन झाले. केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि पक्षाचे कार्यकर्ते केम्पेगौडा विमानतळावर हे राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या स्वागतासाठी आले होते. डीके शिवकुमार यांनी विमानतळाजवळील हॉटेलमध्ये शरद पवार यांच्याशी सुमारे 30 मिनिटे ( D K Shivakumar meet NCP president ) चर्चा केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी ( Sharad Pawar Karnataka visit ) सफरचंदाचा मोठा हार आणला. हा हार कार्यकर्त्यांनी क्रेनने शरद पवारांच्या गळ्यात घातला. कार्यकर्त्यांनी विमानतळ ते बनासवाडी येथील पक्ष कार्यालयापर्यंत रॅली ( NCP office in Banaswadi ) काढण्यात आली.

बनसवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे होणार उद्घाटन - कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बेंगळुरू विमानतळावर भेट घेतली. शरद पवार यांच्या हस्ते आज बंगळुरू येथील बनसवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्नाटक राज्याच्या राजकारणात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी पुढे सरसावला आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांपैकी एक असलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सध्या महाराष्ट्रात 53 जागा जिंकून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत सत्तेत आहे.

कर्नाटकमध्ये मराठी लोकांचे अधिक प्रमाण- कर्नाटकमध्येही मराठी लोकांची संख्या मोठी आहे. शरद पवार यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मराठी लोकसंख्या असलेल्या भागात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या वर्षभरापूर्वीपासूनच शरद पवार यांनी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. बनसवाडी येथील त्यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी देवनहळ्ळी येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यापूर्वीच कर्नाटकात काँग्रेस, भाजप आणि जेडीएसमध्ये तिरंगी लढत होत आहे.

निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीची तयारी- यापूर्वीच, आम आदमी पार्टी, सीपीआयएम आणि एआयएडीएमकेसह अनेक पक्षांनी कर्नाटकच्या राजकारणात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकात आपला उमेदवार उभा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 च्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाने राज्यातील 14 विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने रायबागा, हुक्केरी, बेळगाम उत्तर, सावदत्ती, विजयपुरा, सिंदगी, बसवकल्याण, रायचूर, शिरहट्टी, हुबळी-धारवाड, कारवार, बेल्लारी नगर, हरपनहल्ली आणि बंगळुरूच्या महालक्ष्मी लेआउटमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या एक वर्ष आधीच तयारी सुरू केली आहे.

3 ते 4 मतदारसंघात एनसीपी उभे करणार उमेदवार- शरद पवार हे उद्घाटनानंतर शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्याच्या राजकारणातील प्रवेश आणि आगामी काळात कर्नाटकात पक्षाचे अस्तित्व आणखी मजबूत करण्याच्या निमित्ताने ते बोलण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार महाराष्ट्राच्या सीमेवरील 3 ते 4 मतदारसंघात तसेच बंगळुरू शहरातही आपले उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहेत.

हेही वाचा-Vishwa Deendayalan dies in road accident : तामिळनाडूच्या खेळाडूचा मेघालयातील अपघातात मृत्यू; देश-विदेशात जिंकली होती पदके

हेही वाचा-5 Workers Die : मासळी कारखान्यात विषारी वायू गळती, 5 कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक

हेही वाचा-Railway Jobs 2022 : 147 गुड्स ट्रेन मॅनेजर, 2792 रेल्वे शिकाऊ पदांसाठी नोकऱ्या, आजच अर्ज करा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.