ETV Bharat / bharat

Karnataka CM : डीके शिवकुमार दिल्लीत पोहोचले, काँग्रेस हायकमांडची भेट घेणार - कर्नाटक काँग्रेस

कर्नाटकात काँग्रेसच्या प्रचंड विजयानंतर आता राज्याचा मुख्यमंत्रीपदासाठी दोन दिग्गज नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या संदर्भात कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आज दिल्लीला पोहोचले असून तेथे ते कॉंग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत.

Karnataka CM
कर्नाटकचा मुख्यमंत्री
author img

By

Published : May 16, 2023, 3:48 PM IST

बेंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही साशंकता आहे. रविवारी कर्नाटक काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीतही मुख्यमंत्रीपदाबाबतची स्थिती स्पष्ट न झाल्याने आता हा निर्णय हायकमांडवर सोपवण्यात आला आहे. या संदर्भात कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आज दिल्लीत पोहोचले, तर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तिथे आधीपासूनच उपस्थित आहेत.

  • Karnataka Congress president DK Shivakumar to go to Delhi today amid a cliffhanger regarding the decision on Karnataka CM. While Congress leader Siddaramaiah arrived in Delhi yesterday, Shivakumar stayed in Bengaluru due to a stomach infection.

    (File Photo) pic.twitter.com/vKmClxdv36

    — ANI (@ANI) May 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिवकुमार घेणार सोनिया गांधींची भेट : आज दिल्लीला रवाना होण्यापूर्वी डीके शिवकुमार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधी आज शिमल्याहून दिल्लीला परतत असून यावेळी डीके यांनी त्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना शिवकुमार म्हणाले की, 'काँग्रेस पक्ष माझ्यासाठी देवासमान, माझ्या आईसारखा आहे. आणि मुलांना काय द्यायचे हे देव आणि आईला माहीत आहे. मी माझ्या देवाला भेटायला मंदिरात जात आहे. मी एकटाच जातो आहे. सरचिटणीसांनी मला एकटे येण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी एकटाच दिल्लीला जात आहे'.

'मी ब्लॅकमेल करणार नाही' : शिवकुमार पुढे म्हणाले की, 'माझी प्रकृती चांगली आहे. काँग्रेस पक्ष ही माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. मी माझे काम केले आहे. लोकांनी विश्वास टाकून अधिकार दिले आहेत. राज्यातील जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतील. मला इथे कोणाचीही वाटणी करायची नाही. त्यांना मी आवडो किंवा न आवडो, मी एक जबाबदार माणूस आहे. मी फसवणूक करणार नाही आणि ब्लॅकमेलही करणार नाही'.

दोन्ही नेत्यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा : कर्नाटकात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दोघे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. हे दोन्ही दिग्गज मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:ला अधिक पात्र ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये वैचारिक विरोध नाही, मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत एकमेकांमध्ये अंतर आहे. मात्र, दोन्ही नेत्यांनी हायकमांडच्या सूचनांचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे. डीके शिवकुमार हे हायकमांडवर मुख्यमंत्रिपदासाठी दबाव आणत आहेत. त्यांनी राज्यात पक्ष संघटित करून पक्षाला पुन्हा सत्तेत आणले आहे. तर दुसरीकडे, सिद्धरामय्या बहुसंख्य आमदारांच्या पाठिंब्याने पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत आहेत. काँग्रेस पक्षाने अखेर सत्तेचे समान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी त्यांची मनधरणी करण्यासाठी राज्यातील नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

हेही वाचा :

  1. Race for Karnataka CM 2023 : कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचा पेच कायम; डीके शिवकुमार म्हणाले, माझी ताकद 135 आमदार!
  2. Mamata Banerjee On Congress : काँग्रेसला कर्नाटकात मदत करू, त्यांनी बंगालमध्ये आमच्याबरोबर लढू नये - ममता बॅनर्जी
  3. Karnataka Congress CM : कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडण्याचे हायकमांडसमोर आव्हान; दोघांचीही प्रबळ दावेदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.