ETV Bharat / bharat

Diwali financial lessons : अंधार आणि आर्थिक चिंता दूर कशी करावी? या दिवाळीत आर्थिक सक्षमतेचे धडे घेऊया - dispel darkness financial worries from your family

दिवाळी या, आपण आपली घरे स्वच्छ करू, विविध प्रकारचे कपडे आणि फटाके खरेदी करू आणि आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी दिवे लावू. तसेच आपला गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ स्वच्छ आणि मजबूत करण्यासाठी हाच आवेश स्वीकारला पाहिजे, जेणेकरून आमच्या कुटुंबातील सर्व आर्थिक चिंता दूर होतील. ही दिवाळी कोणते आर्थिक धडे (Diwali lessons to dispel darkness financial worries from your family) घेऊन येते, ते जाणून घ्या. Diwali financial lessons

Diwali financial lessons
दिवाळी आर्थिक सक्षमतेचे धडे घेऊया
author img

By

Published : Oct 22, 2022, 5:51 PM IST

हैदराबाद: या दिवाळीत, आपण आपली घरे स्वच्छ करू, विविध प्रकारचे कपडे आणि फटाके खरेदी करू आणि आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी दिवे लावूयात. आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ स्वच्छ करण्यासाठी, अकार्यक्षम योजना फेकून देण्यासाठी आणि आपल्या कुटुंबातील आर्थिक चिंता दूर करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हाच उत्साह (Diwali lessons to dispel darkness financial worries from your family) दाखवायला पाहीजे. Diwali financial lessons

या दिवाळीत कुटुंब आणि मित्रांसोबत सण साजरा करताना, आर्थिक बाबींवर विचार करण्यासाठी थोडा वेळ देण्यास विसरू नये. दिवाळी दरम्यान आम्ही वैयक्तिक आणि कौटुंबिक सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देतो, कारण हा सण सहसा इतर सणांच्या तुलनेत दुप्पट आनंदाने साजरा केला जातो. 'दिवे लावतांना आणि फटाके फोडतांना आपल्याला बर्‍यापैकी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे भविष्यातील सर्व चिंतांपासून दूर राहण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा विमा काढण्यासाठी आर्थिक स्तरावरही अशीच सतर्कता आवश्यक आहे.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी अधिक सावधपणे पाऊल टाकले पाहिजे. अश्या गुंतवणूकीपासून शक्यतो दूर राहणे चांगले आहे. कारण यामुळे अनेकदा आपली गुंतवणूकीतील रक्कम गमावली जाते. दीर्घकालीन गुंतवणुकीमुळेच आपल्याला आर्थिक स्थिरता मिळते. कोणतीही गुंतवणूक, त्याबाबत पुरेशी माहीती प्राप्त केल्यानंतरच करावी.

लहान मुले फटाके फोडतात तेव्हा, वडील बारकाईने लक्ष ठेवतात. त्याचप्रमाणे, आर्थिक धोरणे तयार करताना, तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. कुटूंबातील सदस्यांच्या विमा पॉलिसी काढणे देखील तेवढेच आवश्यक आहे. बचत आणि गुंतवणुकीची आपण जितक्या लवकर योजना करू तितके चांगले परिणाम मिळतील. आपण चक्रवाढ व्याजाचा लाभ देणाऱ्या योजना घेऊ शकतो, ज्यामुळे महागाईच्या प्रभावावर मात करण्यासाठी पुरेसे उत्पन्न भविष्यात आपल्याला मिळेल. दिवाळीसाठी फटाके आणि मिठाई खरेदी करताना आपण त्यातील विविध प्रकार निवडतो. त्याचप्रमाणे आपल्या गुंतवणुकीतही विविधता असली पाहिजे.

फटाके फोडतांना मध्येच धोका होऊ नये, यासाठी आम्ही सुरक्षा उपकरणे तयार ठेवतो. त्याचप्रमाणे, आपल्याकडे सहा महिन्यांचा ईएमआय आणि जीवनातील कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी खर्चाइतका आकस्मिक निधी असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना दसरा आणि दिवाळी दरम्यान बोनस मिळतो, ज्याचा वापर आपला आकस्मिक निधी वाढवण्यासाठी किंवा कर-बचत योजनांमध्ये किंवा इक्विटी लिंक्ड बचत योजनांमध्ये (ELSS) गुंतवणूक करण्यासाठी केला पाहिजे. Diwali financial lessons

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.