ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलन टुलकिट प्रकरण : दिशा रवीला पुन्हा तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी - शेतकरी आंदोलन टुलकिट प्रकरण

कार्यकर्ती दिशा रवी या 21 वर्षीय युवतीला टूलकिट प्रकरणी पुन्हा तीन दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दिशाच्या समक्ष निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांची चौकशी करण्यात येणार असल्याने तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलन टुलकिट प्रकरण
शेतकरी आंदोलन टुलकिट प्रकरण
author img

By

Published : Feb 19, 2021, 6:59 PM IST

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी या 21 वर्षीय युवतीला टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आली. आज तीला पुन्हा तीन दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. यापूर्वी तीला पाच दिवसाच्या कोठडीत पाठवले होते. आज तीची कोठडी संपणार होती. दिशाची सहकारी असलेली मुंबईतील वकील निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांचीही 22 फेब्रुवरीला चौकशी होणार आहे. दिशाच्या समक्ष त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याने तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

दिशा रवीला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून अटक केली होती. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेले वादग्रस्त टुलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गने हेच टुलकिट दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र नंतर ते ट्विट डिलीट केले. नंतर तिने तिच्या सोशल मीडियावर आणखी एक अपडेटेड डॉक्युमेंट शेअर केले. या कृतीला पोलिसांनी याप्रकरणी खलिस्तान समर्थक संबोधलं होतं.

दिशा रवी "टूलकिट गुगल डॉक"ची संपादक आहे. तिने कागदपत्र तयार करणे आणि प्रसारित करणे यात मुख्य भूमिका निभावल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. तसेच दिशाची सहकारी असलेली मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्या विरोधात दिल्लीत अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. दिशा रवीशी संबंधित शांतनू नावाचा व्यक्तीही पोलिसांच्या रडावर आहे.

टुलकिट काय आहे?

टूलकिट हे एक डॉक्युमेंट असून त्याचा वापर एखादी मोहीम टिकवून ठेवण्यासाठी होतो. मोहिमेसाठी कृती करण्याच्या योजनेचाही यात समावेश असतो. आंदोलन अधिक व्यापक व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून या टुलकिटचा वापर केला जातो. एखादी समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवल्यास त्यासंबंधी व्यावहारिक सल्ला आणि मार्गदर्शन प्रदान करण्याच्या दस्तावेजांना टूलकिट म्हटले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.