पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिलीप कुमार हे माझ्या पिढीचे सर्वात महान आणि अष्टपैलू अभिनेते होते, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
दिलीप कुमार यांच्या निधनानंतर दिग्गजांच्या प्रतिक्रिया.. - दिलीप कुमार मृत्यू
12:58 July 07
माझ्या पिढीतील सर्वात महान आणि अष्टपैलू - इम्रान खान
12:48 July 07
जगभरातील अभिनेत्यांना दिलीप प्रेरणा देत राहतील - महेशबाबू
तेलुगू सुपरस्टार महेश बाबूनेही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिलीप कुमार यांचं काम जगभरातील अभिनेत्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचं जाणं हे भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान आहे, अशा आशयाचं ट्विट त्याने केलं आहे.
12:42 July 07
क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली..
दिलीप कुमार यांना क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. हर्षा भोगले, शिखर धवन यांच्यासह शाहीद आफ्रिदीनेही ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
12:41 July 07
शरद पवारांनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली..
10:12 July 07
"भारतीय चित्रसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला" - अजित पवार
"ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा 'ट्रॅजेडीकिंग' काळाच्या पडद्याआड गेला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली." अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
10:08 July 07
"हिंदी चित्रपट क्षेत्राचं कधीही भरुन न येणारं नुकसान" - एकनाथ शिंदे
"हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. भारतीय सिनेसृष्टी समृद्ध करण्यात त्यांचे अमूल्य योगदान चिरकाल स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली!" असं ट्विट करत मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
10:07 July 07
सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली..
"चित्रपटसृष्टीचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पुर्ण होऊ शकत नाही असे महानायक दिलिप कुमार यांचे निधन झाले. ते अद्भुत क्षमतेचे अभिनेते तर होतेच यासोबतच एक संवेदनशील हृदयाचे नागरिकही होते.स्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ साली 'ज्वार-भाटा' या चित्रपटापासून त्यांनी अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे नया दौर, गंगा-जमुना,देवदास,मुगल-ए-आझम असे अनेक चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरले. त्यांच्या निधनामुळे अभिनयाचे साक्षात विद्यापीठ असणारा एक महान कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली."
09:06 July 07
दाक्षिणात्य अभिनेत्यांनीही वाहिली श्रद्धांजली..
बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य अभिनेत्यांनीही दिलीप कुमार यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. तामिळ अभिनेते प्रकाश राज, तेलुगु अभिनेता गोपीचंद आणि मल्याळम अभिनेता पृथ्वीराज या सर्वांनी ट्विटरच्या माध्यमातून कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
09:04 July 07
बॉलिवूडमधून कित्येकांनी वाहिली श्रद्धांजली..
दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, मनोज जोशी, अक्षय कुमार या सर्वांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजय देवगणने दिलीप कुमार यांच्यासोबतचा आपला एक फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
08:47 July 07
कुमार यांच्या जाण्यानं सांस्कृतिक जगताचं नुकसान - पंतप्रधान मोदी
"दिलीप कुमार यांनी आपल्या कौशल्याने कित्येक पिढ्यांचं मनोरंजन केलं. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक जगताचं नुकसान झालं आहे. चित्रपटविश्वातील 'लेजंड' म्हणून त्यांची ओळख राहील" अशा आशयाची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
08:40 July 07
'हा भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णयुगाचा शेवट' - हिमंता बिस्वा शर्मा
"भारताने आज एक विख्यात असा सुपुत्र, एक महान कलाकार आणि एक अतुलनीय अभिनेता गमावला आहे. भारतीय सिनेमाविश्वाला त्यांनी दिलेलं अतुलनीय योगदान कायम स्मरणात राहील. हा भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णयुगाचा शेवट आहे." अशा आशयाचे ट्विट करत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
08:38 July 07
दिलीप कुमार यांचं योगदान पुढच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील - राहुल गांधी
"दिलीपकुमार जी यांच्या कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. भारतीय चित्रपटसृष्टीतले त्यांचे विलक्षण योगदान पुढच्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील." अशा प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
08:33 July 07
दिलीप कुमार यांना भेटणं अमूल्य क्षण होता; त्यांचं जाणं दुःखद - राजनाथ सिंह
"श्री दिलीप कुमार जी हे एक उत्कृष्ट अभिनेते होते. भारतीय सिनेजगतात त्यांचं अमूल्य योगदान राहिलं आहे. गंगा-जमुना सारख्या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय लाखो चाहत्यांच्या हृदयाला स्पर्शून गेला होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्याने मला अतिशय दुःख झालं आहे. त्यांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यासाठी मुंबईला जाऊन मी त्यांची भेट घेतली होती. या महान अभिनेत्याला भेटणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहते यांच्याबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो." अशा प्रकारची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
08:28 July 07
दिलीप कुमार यांच्या निधनानंतर दिग्गजांच्या प्रतिक्रिया..
मुंबई : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. 7.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ९८ वर्षांचे दिलीप कुमार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे लाखो चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.