नवी दिल्ली - दरवर्षी अर्थसंकल्पाची जेवढी चर्चा होत असते, तेवढीच चर्चा निर्मला सीतारामण यांनी त्या दिवशी नेसलेल्या साडीचीही होत असते.. त्यांच्या साडीचा प्रकार कोणता, साडीचे काठ आणि पदर कसा आहे, साडीवरची नक्षी, रंग यासगळ्याबाबत खूप जणांच्या मनात उत्सूकता असते..2022 चे बजेट सादर करण्यावेळी निर्मला सीतारामन यांनी हॅण्डलूम सिल्क प्रकारातली सा़डी नेसली होती. चमकदार तपकिरी रंगाच्या साडीला मरून किंवा डार्क चॉकलेटी वर्कआऊट केलेली साडी त्यांनी 2022 च्या बजेटदिवशी नेसली होती. साडीचा पदर भरजरी होता.
![budget 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17636942_todaylook.jpg)
2023 चा अर्थसंकल्प - मागील काही वर्षात अर्थमंत्री अर्थसंकल्पाच्या दिवशी चमकदार रंगांची साडी नेसून जात असल्याचे आपण पाहिले आहे. 2022 मध्ये त्या मरून हातमाग पॅटर्नची साडी परिधान केली होती. 2023 चा अर्थसंकल्प सादर करनाता निर्माला सीतारामण यांनी टेम्पलची साडी नेसली होती. ही साडी सामान्यतः कापूस, रेशीम किंवा मिश्रणाने बनवली जाते. या प्रकारची साडी विशेष प्रसंगी परिधान केली जाते. या साडीची चमक लाल रंगाची असते.
![Budget 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17636942_fm3.jpg)
2022 अर्थसंकल्प - निर्मला सीतारामण यांनी मागच्या अर्थसंकल्पात चॉकलेटी रंगाची साडी नेसली होती. ज्यात सुरक्षेचा संदेश दिला होता. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन अनेकदा नोटांशी जुळणारी साडी नेसतात. त्यांनी क्रीम कलरची मंगलागिरी साडीही नेसलेली दिसली होती. 20 रुपयांच्या नोटेशी जुळणार्या हिरव्या मंगलगिरी साड्यांचा देखील त्यांनी 2019 मध्ये नेसली होती. त्यानंतर आता संबळपुरीच्या साडीची चर्चा होताना दिसत आहे.
![Budget 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17636942_fm2.jpg)
2021 अर्थसंकल्प - निर्मला सीतारामण यांनी कोविडनंतरच्या बजेटमध्ये लाल रंगाची साडी नेसली होती. शक्ति आणि संकल्पाचा संदेश या साडीमधून त्यांनी दिला होता. कायमच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या साडीची चर्चा होताना दिसते. यंदा निर्मला सीतारमण यांनी तपकिरी बॉर्डरची लाल रंगाची साडी परिधान केली होती. दरवर्षी सीतारमण अर्थसंक्लप सादर करताना लाल शेडच्या साड्या परिधान करताना दिसतात. गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी परिधान केली होती.
![Budget 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17636942_fm1.jpg)
2020 चा अर्थसंकल्प - निर्मला सीताराण यांनी 2020 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी घातली होती. त्या साडीच्या काठावरही सोनेरी बॉर्डर केली होती.
![Budget 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17636942_sari11.jpg)
2019 चा अर्थसंकल्प - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी निर्माला सीतारामण यांनी गडद गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी नेसली होती. या साडीवरही गोल्डन बॉर्डर लावलेली होती. त्यामुळे साडीची चर्चा त्यावेळी संसदेत पाहायला मिळाली.
![Budget 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17636942_fmaa.jpg)
हेही वाचा - Budget 2023 : तुमचे पॅन कार्ड झाले तुमच्या ओळखीचा पुरावा
हेही वाचा - Budget 2023: अर्थसंकल्प २०२३.. काय स्वस्त, काय महाग.. पहा संपूर्ण यादी..